पुष्पकमल दाहाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुष्पकमल दाहाल

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
३ ऑगस्ट २०१६
राष्ट्रपती विद्या देवी भंडारी
मागील खड्ग प्रसाद शर्मा ओली
कार्यकाळ
१८ ऑगस्ट २००८ – २५ मे २००९
राष्ट्रपती रामवरण यादव
मागील गिरिजाप्रसाद कोईराला
पुढील माधवकुमार नेपाळ

विद्यमान
पदग्रहण
मे १९९९
मागील पदनिर्मिती

नेपाळचा परराष्ट्रमंत्री

जन्म ११ डिसेंबर, १९५४ (1954-12-11) (वय: ६९)
ढिकुरपोखरी, कास्की जिल्हा, नेपाळ

पुष्पकमल दाहाल उर्फ प्रचंड ( ११ डिसेंबर १९५४) हा एक नेपाळी राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (माओवादी-केंद्र) ह्या पक्षाचा तो विद्यमान चेरमन आहे. ह्यापूर्वी प्रचंड २००८ ते २००९ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

कट्टर साम्यवादी विचारांच्या प्रचंडने १९९६मध्ये नेपाळ सरकारविरोधात सशस्त्र बंडखोरी चालू केली. त्यानंतर घडलेल्या यादवीयुद्धात सुमारे १७,००० नेपाळी लोक मृत्यूमुखी पडले. अखेर २००८ साली चकमकी थांबल्या व निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकीत बहुमत मिळवून प्रचंड सत्तेवर आला परंतु केवळ एका वर्षातच त्याला राजीनामा देणे भाग पडले.

२०१६ मध्ये नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झाले ज्यामुळे नेपाळी नेत्यांनी प्रचंडची पंतप्रधानपदावर पुन्हा निवड केली.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत