पुणे पुस्तक महोत्सव
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |

पुणे पुस्तक महोत्सव हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आहे . वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी सुरू केलेली ही एक चळवळ आहे असे मानले जाते .[१]
कोठे
[संपादन]राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या माध्यमातून पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय पटांगणात या महोत्सवाचे आयोजन केले जाते .
स्वरूप
[संपादन]
२ ० २ ३ साली पुणे शहरात या महोत्सवाचे आयोजन प्रथम करण्यात आले .विविध प्रकाशन संस्था येथे आपापल्या प्रकाशनांची पुस्तके सवलतीच्या दरात वाचकांसाठी उपलब्ध करून देतात . वाचन , लेखन , संगीत , नाट्य , काव्य अशा विविध साहित्य प्रकारांवर आधारित उपक्रमांचे आयोजन येथे केले जाते .[२] विविध विषयां वर आधारित परिसंवाद आयोजित केले जातात . शाळा , महाविद्यालये येथील विद्यार्थी - विद्यार्थिनी यातील उप्रक्रमात आपले योगदान देतात . लहान मुलांसाठी विशेषत्वाने विविध उपक्रमांचे , स्पर्धाचे आयोजन या निमित्ताने केले जाते .

वाचनाचा तास
[संपादन]पुणे पुस्तक महोत्सवाचा भाग म्हणून पुण्यातील नागरिकांना एक तास सलग वाचन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते . एक विशिष्ट वेळ नेमून देऊन त्या एका तासात वाचकांनी आपल्या आवडीचे पुस्तक वैयक्तिक स्वरूपात वा सामूहिक ठिकाणी एकत्रित येऊन करावे असे आवाहन केले जाते . या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो .[३]
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
[संपादन]२ ० २ ४ साली १ ३ डिसेंबर या दिवशी पुस्तकांचा वापर करून सुमारे १ ५ फूट आकाराच्या सरस्वतीच्या प्रतीकाचे चिहन साकारण्यात आले आहे . यासाठी ४ ,० ० ० हुन अधिक पुस्तकांचा वापर करण्यात आला. या उपक्रमाची नोंद विश्वविक्रम म्ह्णून दाखल करण्यात आली आहे.[४]
चित्रदालन
[संपादन]-
अहिल्याबाई होळकर चरित्र प्रदर्शनी
-
दर्शनीय भाग
-
कलाकृती १
-
कलाकृती २
-
शिल्प 2
-
पुस्तक स्टाॅलवरील कलाकृती
-
दर्शनीय सजावट
-
पुस्तक महोत्सवाचा आनंद घेणारे नागरिक
संदर्भ
[संपादन]- ^ CD (2024-12-10). "पुस्तक महोत्सव आवाहन". Marathi News Esakal. 2024-12-16 रोजी पाहिले.
- ^ "पुणे पुस्तक महोत्सव में साहित्यकारों का जमावड़ा लगेगा". www.eaajkaanand.com (इंग्रजी भाषेत). 2024-12-16 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, प्रभात (2024-12-10). "Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत 'शांतताR". Dainik Prabhat. 2024-12-16 रोजी पाहिले.
- ^ "Photos: वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी पुण्यात पुस्तक महोत्सव आयोजित, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद". Loksatta. 2024-12-14. 2024-12-16 रोजी पाहिले.