Jump to content

पी. चिदंबरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पलनीअप्पन चिदम्बरम (तामिळ: பழனியப்பன் சிதம்பரம்) ( सप्टेम्बर १६, इ.स. १९४५) माजी केंद्रीय अर्थमंत्री.

शिक्षण

[संपादन]

चिदम्बरम यांनी त्यांचे शालेय शिक्षण चेन्नई येथील मद्रास क्रिस्चियन कॉलेज हायर सेकण्डरी स्कूल मधून पूर्ण केले. त्यांनी चेन्नई मधील प्रेसिडेन्सी कॉलेज मधून संख्याशास्त्रात पदवी सम्पादन केली आणि त्यानन्तर चेन्नईतीलच मद्रास लॉ कॉलेज मधून ते विधी या विषयात पदवीधर झाले. अमेरिकेतील हावर्ड बीझनेस स्कूल मधून त्यांनी एम.बी.ए ही पदव्युत्तर पदवी सम्पादन केली.

राजकिय कारकीर्द

[संपादन]

चिदम्बरम इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडू राज्यातील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या निवडणुकीत तामिळ मनिला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.

ते राजीव गान्धींच्या मन्त्रीमण्डळात उपमन्त्री आणि राज्यमन्त्री होते. इ.स. १९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मन्त्रीमण्डळात ते वाणिज्यमन्त्री झाले. त्यांनी वाणिज्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आयात-निर्यात धोरणात महत्त्वाचे बदल केले. भारताचे नवे आर्थिक धोरण बनविण्यात नरसिंह राव आणि अर्थमन्त्री मनमोहन सिंह यांच्याबरोबरच चिदम्बरम यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.[]

चिदम्बरम इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ दरम्यान देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये अर्थमन्त्री होते. त्यांनी इ.स. १९९७-इ.स. १९९८ साठीचा मांडलेला अर्थसंकल्प ’आदर्श अर्थसंकल्प’ म्हणून मानला जातो.[] इ.स. १९९८ ते इ.स. २००४ अशी सहा वर्षे सरकारबाहेर राहिल्यानंतर चिदम्बरम मनमोहन सिंह यांच्या मन्त्रीमण्डळात मे इ.स. २००४ मध्ये परत अर्थमन्त्री झाले. ते त्या पदावर नोव्हेम्बर ३०, इ.स. २००८ पर्यंत होते. नोव्हेम्बर २६, इ.स. २००८ रोजी मुम्बईवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानन्तर गृहमन्त्री शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला आणि भारताचे नवे गृहमन्त्री म्हणून त्यांच्या जागी चिदम्बरम यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून चिदम्बरम गृहमन्त्री पदावरच आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [१]
  2. ^ [२]