Jump to content

पिंग ॲन फायनान्स सेंटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
षेंचेन शहरामधील पिंग ॲन फायनान्स सेंटर

पिंग ॲन फायनान्स सेंटर (चिनी: 平安国际金融中心) ही चीन देशाच्या क्वांगतोंग प्रांतामधील षेंचेन ह्या शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. ५९९ मीटर (१,९६५ फूट) इतकी उंची असलेली व २०१७ साली बांधून पूर्ण झालेली ही चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची तर जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक उंची असलेली इमारत आहे. ह्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १५० कोटी अमेरिकन डॉलर्स इतका खर्च आला व आजच्या घडीला षेंचेन व्यापार जिल्ह्याचे एक प्रमुख आकर्षण आहे.

बाह्य दुवे

[संपादन]

गुणक: 22°32′11″N 114°03′02″E / 22.536399°N 114.050446°E / 22.536399; 114.050446