पिंगाली वेंकय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिंगाली वेंकय्या
Venkayya on a 2009 stamp of India
जन्म २ ऑगस्ट १८७६
मृत्यू ४ जुलै, १९६३ (वय ८६)
नागरिकत्व भारत भारतीय
ख्याती भारतीय राष्ट्रध्वजाचे कल्पक

पिंगाली वेंकय्या (नामभेद व्यंकय्या) (२ ऑगस्ट १८७६ [१] - ४ जुलै १९६३) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. ते महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी होते आणि ज्या ध्वजावर भारतीय राष्ट्रध्वज आधारित होता त्याचे डिझायनर होते. त्यांचा जन्म एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात [२] भातलापेनुमारु, मछलीपट्टणमजवळ, आंध्र प्रदेश राज्यात झाला. [३]

इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी विविध तथाकथित राष्ट्रीय ध्वज भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सदस्यांनी वापरले होते. कृष्णा जिल्ह्यातील पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची रचना केली आणि [४] एप्रिल १९२१ रोजी विजयवाडा शहराच्या नंतरच्या भेटीदरम्यान महात्मा गांधींना तो सादर केला.

द हिंदू मधील माहिती नुसार, "पिंगली व्यंकय्या हे शेतकरी आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी मछलीपट्टणम मध्ये एक शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. इ.स. १९६३ मध्ये त्यांचा गरिबीत मृत्यू झाला. भारतीय समाजाने मात्र त्यांची दखल त्यावेळी घेतली नाही. इ.स. २००९ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकार तर्फे एक टपाल तिकीट जारी करण्यात आले. तसेच २०११ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला. परंतु या प्रस्तावावर केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाही.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Who is Pingali Venkayya? Remembering the architect of India's national flag". India Today (इंग्रजी भाषेत). 2 August 2018. 12 December 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Who is Pingali Venkayya? Meet the man who designed India's first national flag". sg.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-22 रोजी पाहिले.
  3. ^ Archana, K. C. (2 August 2015). "A salute to the man who designed the Tricolour: Pingali Venkayya". India Today. 17 August 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Andhra Chief Minister Seeks Bharat Ratna Award For Designer Of Indian Flag". NDTV.com. 13 March 2021. 13 March 2021 रोजी पाहिले.
  5. ^ Mellymaitreyi, M. L. (18 November 2012). "State recommends Bharat Ratna for Pingali Venkayya". द हिंदू. Archived from the original on 2012-11-20. 9 April 2013 रोजी पाहिले.