पिंक फ्लॉइड
Jump to navigation
Jump to search
पिंक फ्लॉइड | |
---|---|
![]() | |
संगीत प्रकार | रॉक |
कार्यकाळ | इ.स. १९६५-१९९६, इ.स. २००५ |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
पिंक फ्लॉइड (मराठी लेखनभेद: पिंक फ्लॉईड ; इंग्रजी: Pink Floyd ;) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बॅंड होता. इ.स. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बॅंड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बॅंड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.
इ.स. १९६५ साली रॉजर वॉटर्स, निक मेसन, रिचर्ड राइट, सिड बॅरेट या चौघांनी हा चमू स्थापला. इ.स. १९६० च्या उत्तरार्धात लंडनातील अंडरग्राउंड संगीतक्षेत्रात ते नावाजले जाऊ लागले. बॅरेटाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इ.स. १९६७ साली द पायपर अॅट द गेट्स ऑफ डॉन हा पदार्पणाचा आल्बम रचला. इ.स. १९६८ साली गायक-गिटारवादक डेव्हिड गिल्मोर या चमूत दाखल झाला.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "पिंक फ्लॉइड चमूचे अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)