पालखी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पालखी म्हणजे एक जुने ऐतिहासिक वाहतुकीचे साधन आहे.[१] ती म्हणजे लाकडापासून बनविलेला एक प्रकारचा आच्छादिलेला लहान कक्ष, ज्यात बसण्याची सोय असते. त्यास समोर व मागे जाड दांडा असतो. कक्षात माननीय वा आदरणीय व्यक्ती बसते. पालखी मग दोन वा जास्त व्यक्तिंद्वारे दांड्यास धरून उचलल्या जाते व इच्छित ठिकाणी नेली जाते.
ऐतिहासिक माहिती
[संपादन]राजांच्या काळात, ते पालखीतून प्रवास करीत असत. राजाची पालखी फारच सुशोभित रहात होती. हिरे माणिक मोती जडविलेल्या, सोन्याचे बाह्य आवरण असलेल्या पालख्या पूर्वी असत. त्यावर उत्तम कारागिरी केलेली असे. त्यास रेशमाचे गोंडे लावण्यात येत असत. पालखीतून जाणारा ईसम वा व्यक्ति बहुमानास/आदरास पात्र अशीच असे.
धार्मिक महत्व
[संपादन]भारतीय परंपरेत विविध मंदिरांमध्ये देवतांचे पालखी उत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्र राज्यामधील आषाढी पंढरपूर वारी,[२] कोकणामधील होळी उत्सवातील पालखी नाचविणे[३] अशा काही धार्मिक संकल्पना पालखीशी जोडलेल्या दिसून येतात.
हे ही पहा
[संपादन]- http://santeknath.org/palkhi%20sohala.html Archived 2015-07-21 at the Wayback Machine.
चित्रदालन
[संपादन]-
पालखी
संदर्भ
[संपादन]- ^ Bengal: Past and Present (इंग्रजी भाषेत). Calcutta Historical Society. 1907.
- ^ Mokashi, D. B. (1987-07-01). Palkhi: An Indian Pilgrimage (इंग्रजी भाषेत). State University of New York Press. ISBN 978-1-4384-1341-9.
- ^ "कोकणातील शिमगोत्सवाचा अनोखा रंग". महाराष्ट्र टाइम्स. 2024-06-22 रोजी पाहिले.