पारसिक डोंगर
पारसिक डोंगर हा ठाणे जिल्ह्यातील डोंगर आहे. साष्टी बेटाच्या पूर्वेस भारताच्या मुख्य भूमीवर असलेल्या या डोंगराची उंची १९८५मध्ये २३५ मीटर होती.[१][२] या डोंगराचा माथा म्हणजे ७ किमी उत्तर-दक्षिण धावणारी डोंगरकपार आहे. १९८५नंतर सुरू झालेल्या दगडखाणींमुळे या टेकडीचा आकार आणि उंची बदलले गेले आहेत. या डोंगरावरील १५ किमी२ परिसरात अभयारण्य आहे. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.[३][४]
या डोंगराचा काही भाग नवी मुंबईमध्ये मोडतो. याच्या शिखराजवळ नवी मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान आहे.[५]
बोगदा
[संपादन]या डोंगरातून पारसिक बोगदा गेला आहे. हा बोगदा भारत आणि आशियातील सगळ्यात जुन्या बोगद्यांपैकी एक आहे. १९१६मध्ये खणलेल्या या बोगद्यातून मध्य रेल्वेची वाहतूक होते. त्याआधी बांधलेला रेल्वेमार्ग डोंगराला वळसा घालून मुंब्रा-कळवामार्गे मुंबईला ठाण्याशी जोडतो.
दगडखाणी आणि अनधिकृत वसाहती
[संपादन]विसाव्या शतकाच्या शेवटी हा डोंगर फोडून तेथील दगडमाती मुंबई महानगरातील बांधकामासाठी वापरली गेली. डोंगराचा सुमारे ९% भाग यात नष्ट झाला आहे. याच गतीने पुढील काही वर्षांत ३०% डोंगर नाहीसा होण्याचा अंदाज आहे.[६][७] शीळफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हजारो (२०१२ च्या अंदाजानुसार ११,०००) अनधिकृत झोपड्या वर घरे बांधली गेली आहेत. याशिवाय डोंगरावर सुमारे १०० अनधिकृत देवळे, मशीदी व इतर धार्मिक स्थळे बांधली गेली आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ Annapurna Shaw (2004). The Making of Navi Mumbai. p. 92.
- ^ हरीश कापडिया (2004). ट्रेक द सह्याद्रीज (पाचवी आवृत्ती). p. 51.
- ^ Annapurna Shaw (2004). The Making of Navi Mumbai. pp. 91, 116.
- ^ M.S. Kohli (2004). Mountains of India: Tourism, Adventure and Pilgrimage. p. 259. ISBN 8173871353.
- ^ "Bombay HC pulls up NMMC for acquiring 6 plots adjoining Mayor's residence". इंडियन एक्सप्रेस. २०१६-११-१७ रोजी पाहिले.
- ^ Clara Lewis, TNN (3 September 2012). "Encroachment, quarrying take a toll on Parsik Hill". Times of India. 2013-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 April 2013 रोजी पाहिले.
- ^ Annapurna Shaw. The Making of Navi Mumbai. p. 119.