पाय दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पाय दिवस (पाय डे - Pi Day) हा दरवर्षी गणितीय स्थिरांक π (pi = 3.14159) साठी साजरा केला जातो. π या स्थिरांकातले 3, 1, आणि 4 हे पहिले तीन महत्त्वाचे अंक असल्यामुळे वर्षातील तिसऱ्या महिन्यातील १४ तारखेला म्हणजेच १४ मार्चला (महिना/दिवसाच्या स्वरूपात 3/14) पाय दिवस साजरा केला जातो.[१] भौतिक शास्त्रज्ञ असलेल्या लॅरी शॉ यांनी सर्वप्रथम १९८८ साली सॅन फ्रान्सिस्कोधील एक्सप्लोरेटोरियम (विज्ञान संग्राहालय) मध्ये पाय दिवसाचे आयोजन केलं होतं. २००९ मध्ये, युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने अमेरिकेत १४ मार्च हा राष्ट्रीय पाई डे म्हणून साजरा करण्याचा ठराव संमत केला. युनेस्को (UNESCO)च्या ४० व्या सर्वसाधारण परिषदेने नोव्हेंबर २०१९ मध्ये पाय दिवस हा आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला.[२] २०१० मध्ये, गुगलने पाई डे साठी गुगल डूडल सादर केले होते.

शिवाय हा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्मदिनही आहे. २२ जुलै या दिवसालासुद्धा ‘पाय निकटन दिन’ (पाय अ‍ॅप्रॉक्झिमेशन डे) असे संबोधले जाते; कारण पायची २२/७ ही किंमत![३]

π (पाय)[संपादन]

पाय (π) हा स्थिरांक वर्तुळाच्या परीघ आणि व्यास यांच्या लांबीचे गुणोत्तर दर्शवतो. या स्थिरांकाचे मूल्य जवळपास ३.१४१५९२६५४ इतके आहे. गणनाच्या (calculation) सोयीकरिता हे जवळपास २२/७ किंवा ३५५/११३ असेही धरले जाते. पाय हा गणितातील एक महत्त्वपुर्ण स्थिरांक आहे. तसेच विज्ञानाच्या बऱ्याच शाखांमध्ये पायचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

अपरिमेय संख्या म्हणून, πला सामान्य अपूर्णांक म्हणून व्यक्त करता येत नाही, जरी अपूर्णांक जसे की २२/७ (३.१४२८५७१४) सामान्यतः पायची अंदाजे किंमत म्हणून वापरले जातात. शिवाय पायचे दशांस रूप कधीही संपत नाही आणि त्यामध्ये कसलिही पुनरावृत्ती पण होत नाही.

हे देखील पहा[संपादन]

π स्थिरांक

संदर्भ[संपादन]

  1. ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-03-14). "Pi Day : गणितातली कोडी उलगडणारा पाय (π) हा दिन 14 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या". marathi.abplive.com. 2022-03-14 रोजी पाहिले.
  2. ^ https://plus.google.com/+UNESCO (2020-06-08). "International Day of Mathematics". UNESCO (इंग्रजी भाषेत). 2022-03-14 रोजी पाहिले.
  3. ^ "कुतूहल : 'पाय' दिवस!". Loksatta. 2022-03-14 रोजी पाहिले.