पापलेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पापलेट

पापलेट (Pomfret) या प्रकारचा मासा आशिया खंडातील लोक खातात. खाऱ्या पाण्यातील हा मासा हिंदी महासागरात, अटलांटिक महासागरात आणि प्रशांत महासागरात आढळतो.

माहिती[संपादन]

पापलेट

पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा ब्रामा असे आहे.मासळीच्या बाजारात पॉँफ्रेट मासे पापलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आणि काळा पाँफ्रेट. करडा आणि पांढरा पॉंफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा कॉंड्रोप्लायटिस वंशातला आहे. काळा पाँफ्रेट फोर्मिओनिडी मत्स्यकुलातला असून फोर्मिओ वंशाचा आहे. करड्या अथवा रुपेरी पाँफ्रेटचे शास्त्रीय नाव स्ट्रोमॅटियस अर्जेंटियस, पांढऱ्याचे कॉंड्रोप्लायटिस चायनेन्सिस आणि काळ्याचे फोर्मिओ नायजर आहे. व्यापारी दृष्टीने फोर्मिओ नायजर या माशाला जरी पाँफ्रेट म्हणत असले, तरी तो खरा पॉंफ्रेट नव्हे. या काळ्या पाँफ्रेटला इंग्रजीत ब्राऊन पाँफ्रेट म्हणतात.


प्रकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

[१]

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92a93e92a93294791f