Jump to content

पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघ हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ तर २००९ पासून पुन्हा अस्तित्वात होता. सदर मतदारसंघ हा बिहार राज्याचा भाग आहे.

राष्ट्रीय जनता दलाच्या मिसा भारती या पाटलीपुत्र मधून विद्यमान खासदार आहेत ज्या २०२४ लोकसभा निवडणूकीद्वारे विजयी झाल्या. लोकसभेतील खासदार म्हणून त्यांचा हा पहिलाच कार्यकाळ आहे.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१ प्रमाणे पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता :

  • पाटणा जिल्हा : पाटणा शहर उप-विभाग, पाटणा सदर उप-विभाग (मसरौही आणि पुनपुन ठाणी वगळून), दिनापूर उप-विभाग (बिक्रम, पालीगंज आणि बिहटा ठाणी वगळून) व बढ उप-विभागातील फतवा ठाणं


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, २००८ प्रमाणे पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता :

  • १८६ - दानापूर विधानसभा मतदारसंघ
  • १८७ - मणेर विधानसभा मतदारसंघ
  • १८८ - फुलवारी विधानसभा मतदारसंघ
  • १८९ - मसरौही विधानसभा मतदारसंघ
  • १९० - पालीगंज विधानसभा मतदारसंघ
  • १९१ - बिक्रम विधानसभा मतदारसंघ

पाटलीपुत्र मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
बिहार राज्य
१९५२ सारंगधर सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ ते २००९ : पाटणा लोकसभा मतदारसंघाचा भाग
२००९ रंजन प्रसाद यादव जनता दल (संयुक्त)
२०१४ राम क्रिपाल यादव भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ मिसा भारती राष्ट्रीय जनता दल

निवडणूक निकाल

[संपादन]

१९५२ लोकसभा निवडणूक

[संपादन]
१९५२ लोकसभा निवडणूक : पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारंगधर सिन्हा ६४,९९२ ४८.६३%
समाजवादी पक्ष (भारत) ज्ञानचंद ३८,२९४ २८.६५% ‌−
अपक्ष नवदीप चंद्र घोष २३,६५० १७.७०% ‌−
किसान मजदूर प्रजा पक्ष प्रफुल्ल रंजन दास ६,७०९ ५.०२% ‌−
नोंदणीकृत मतदार २,८८,९८२ -
झालेले मतदान १,३३,६४५ ४६.२५%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने जागा जिंकली (नवीन जागा) उलटफेर

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]