Jump to content

फूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाकळ्या या पानावरून पुनर्निर्देशित)

फूल हे फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसरस्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो. फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते. फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा[] असे म्हणतात.

वसंत ऋतुमध्ये फुललेली जांभळ्या लिलिची फुले

अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. शास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे रचनात्मक अवयव होय . अंकुराचा मुख्यत्वेकरून पुनरुत्पादनाकरिता रूपांतरीत भाग.

फुले

फुलांची रचना

[संपादन]

काही वनस्पतींत खोडाच्या टोकावर किंवा पानाच्या खाचेत एकच फूल येते. काही वनस्पतींत त्याच जागी अनेक फुले येऊन फुलांची गुच्छासारखी रचना तयार होते तिला 'फुलोरा' ( Inflorescence) म्हणतात. फुलोऱ्यातील फुलांच्या उमलण्याच्या दिशेवरून त्याची दोन मुख्य प्रकारांत विभागणी केलेली आहे.

  1. अकुंठित फुलोरा (Racemose Inflorescence) - या प्रकारच्या फुलोऱ्यात अक्षाच्या टोकावर नवीन फुले येतात आणि आधी उमललेली फुले पुष्पवृन्ताच्या किंवा अक्षाच्या खालच्या बाजूला असतात. उदाहरणार्थ: पळस, गुलमोहर, शंकासूर, पिचकारी
अकुंठित फुलोरा-पिचकारी
  1. कुंठित फुलोरा (Cymose Inflorescence) - कुंठित फुलोऱ्यात अक्षाच्या तळाला नवीन फूल उमलते त्यामुळे पुष्पवृन्ताची वाढ तिथेच कुंठित होते. उदाहरणार्थ: मोगरा, जाई, जुई.
कुंठित फुलोरा-मोगरा

फुलांचे अवयव

[संपादन]

फुलांचे अवयव मुख्यत्वे चार मंडलांमधे रचलेले असतात, त्यातील वरील दोन मंडले प्रजोत्पतीचे काम करतात व खालील दोन मंडले त्यांना मदतगार म्हणून काम करतात.

फुलांची रचना
  • पहिले मंडल: Calyx पुष्पकोश – संदल मंडल
  1. हे सर्वात खालचे मंडळ असून ते फुलाच्या देठाच्या टोकाशी रचलेले असते.
  2. त्याच्या पाकळ्यांना संदले म्हणतात. (Sepals)
  3. या पाकळ्या बहुतकरून हिरव्या रंगाच्या असतात, परंतु काही वेळा रंगीत देखील असतात त्यांना दलाभ (petaloid calyx) असे म्हणतात.
  4. पुष्पकोश किंवा संदल मंडल मुख्यत्वे आतील प्रजोत्पादन करणाऱ्या परागकोश आणि जायांग या अवयवांच्या संरक्षणाचे काम करतात.
  • दुसरे मंडल: Corolla -प्रदल मंडल, पुष्पमुकुट
  1. हे संदल मंडलाच्या आतील बाजूस असते.
  2. ह्याच्या पाकळ्यांना प्रदल (petal) असे म्हणतात.
  3. बहुतांशी प्रदले ही रंगीबेरंगी असतात.
  4. किटकांना किंवा पक्ष्यांना परागीभवनासाठी आकर्षित करण्याचे कार्य प्रदले करतात.
  • तिसरे मंडल : Androecium केसरमंडल, पुंकेसर मंडल
  1. हे तिसरे मंडल प्रदल मंडलाच्या आतल्या बाजूला असते. याला पुंकेसर मंडल असे म्हणतात.
  2. ज्या भागांचे हे मंडल बनलेले असते त्याला केसरदल (Stamens) असे म्हणतात.

केसरदलाचे तीन भाग असतात:

  1. केसरतंतू – (Filament)
  2. परागकोश Anthers: परागकोशात चार परागकोष्ठ, प्रत्येक परागकोष्ठात असंख्य परागकण असतात. परागकोश (परागाशय) Anthers, pollen sac, परागकोष्ठ Pollen graim.
  3. संधानी Connective (संयोगिका).
  • चौथे मंडल: Gynoecium जायांग
  1. याला स्त्री किजमंडल असेही म्हणतात.
  2. ज्या भागांचे हे बनलेले असते त्याला किंज (Carpel) असे म्हणतात.

किंजमंडलाचे सुद्धा तीन भाग असतात.

  1. किंजपुट (Ovary) - किंजपुटामध्ये अतिलहान बीजक पर्यण्ड (Ovule) असतो. प्रत्येक बीजकामधे एक लंबवर्तुळाकृती पेशी असते. तिला गर्भकोश किंवा भ्रूण-स्थूल (Embryo sac) असे म्हणतात.
  2. किंजल - कुक्षिवृन्त (Style)
  3. किंजल्क – कुक्षी – (Stigma)

एकाच फुलात जेव्हा चारी मंडले असतात त्या वेळी त्या पुष्पाला पूर्णपुष्प (Complete Flowers) असे म्हणतात. पण चारांपैकी एक जरी मंडल कमी असले तर ते फूल अपूर्णपुष्प (Incomplete Flower) समजले जाते. केसरमंडल व किंज - मंडल ही दोन्ही मंडले एकाच फुलात असतात. त्याला द्विलिंगी (Hermaphrodite – bisexual) फूल असे म्हणतात. परंतु दोन्ही मंडलापैकी एक जरी मंडल कमी असले तर त्याला एकलिंगी (Unisexual) फूल असे म्हणतात. मग ते फूल केशरपुष्प (Staminate – male), अगर किंजी पुष्प (Pistillate – female) म्हणून ओळखले जाते. जर कोणत्याही फुलात दोन्ही (केसर किंवा किंज मंडले) नसली तर ते फूल वन्ध्यपुष्प समजले जाते (Neuter).

फुले

फुलाचे उपयोग सुशोभीकरणासाठी, पूजेसाठी व कीटकांना अन्न म्हणून होतो.

फुले निरनिराळ्या रंगांची, रंगांच्या छटांची असतात.भारतातील सुहासिनी सण त्योहाराच्या वेळी फुले केसात माळतात. फुलात चार प्रकारची रंगद्रव्ये आढळतात. जनुकीय गुणधर्म फुलात निरनिराळी रंगद्रव्ये तयार करण्यास कारणीभूत ठरतात. []

  1. क्लोरोफिल - हरित रंगद्रव्य
  2. कॅरेटिनॉइड्स - पिवळा, नारंगी, लाल रंग
  3. ॲंथोसायनीन - लाल, जांभळा, निळा, आमसुली रंगद्रव्ये
  4. बेटालेंन्स - लाल-पिवळा
  1. ^ "फुलोरा". विकिपीडिया. 2016-05-21.
  2. ^ "वनस्पतींना निरनिराळ्या रंगांची फुले कशी येतात?". Loksatta. 2020-02-06 रोजी पाहिले.