पहिला राजराज चोळ
Appearance
पहिला राजराज चोळ हा दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा कर्तबगार राज्यकर्ता होता. याने इ.स. ९८५ ते इ.स. १०१४ या काळात राज्यकारभार सांभाळून चोळ राज्याचे साम्राज्य होण्यात मोठा हात भार लावला. याच्या काळात चोळ साम्राज्याने श्रीलंंका, पूर्व भारत, मगध, आजचा आधुनिक बंगाल, ओडिशा, म्यानमार आणि थायलंडचे काही भाग, आणि मलेशिया, इंडोनेशिया या प्रदेशांवर नियंत्रण मिळवले. बहुधा पहिला राजराज चोळ व त्यानंतरचे चोळ राज्यकर्ते हे एकमेव भारतीय राज्यकर्ते होते ज्यांनी साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते व त्यासाठी भारताबाहेरील प्रदेशावर आक्रमणे केली. मालदीव बेटे हे त्यापैकी एक. पहिला राजराज चोळ याने त्याच्या काळात अनेक प्रसिद्ध व महाकाय दक्षिण भारतीय मंदिरांची निर्मिती केली.