पलाश सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पलाश सेन (बंगाली: পলাশ সেন ; रोमन लिपी: Palash Sen) (२३ सप्टेंबर, इ.स. १९६५ ; वाराणसी, उत्तर प्रदेश - हयात) हा बंगाली-भारतीय गायक, रॉक संगीतकार, अभिनेता, डॉक्टर आहे. हा युफोरिया या भारतीय रॉक बॅंडचमूतील एक गायक आहे. रॉक संगीतासोबतच याने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिकाही रंगवल्या आहेत. शिक्षणाने व पेशाने तो वैद्यकशास्त्रातील डॉक्टर आहे.

कारकीर्द[संपादन]

पलाश सेन पेशाने वैद्य असून त्याने दूरदर्शन वरील विविध कार्यक्रमात गुरूंची भूमिका साकार केली आहे. एक्स फॅक्टर या संगीत गुरुकुल कार्यक्रमात त्याने मुख्य गुरूची भूमिका निभावली आहे.

अभिनय[संपादन]

सेन याने फिलहाल या इ.स. २००२ साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात नायकाची भूमिका केली. इ.स. २०१० सालातल्या मुंबई कटिंग या हिंदी चित्रपटातही त्याने अभिनय केला.

बाह्य दुवे[संपादन]