पर्वतीय प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातील अनेक नद्यांचे स्रोत हे झऱ्यांचे स्वरूपात असून,त्यांच्या सभोवताली बहुतेक ठिकाणी शंकराची मंदिरे बांधलेली आहेत. मोठ्या प्रमाणात भूजल आढळणाऱ्या या भूजल पर्वताशिखारांना पूर्वापार सांस्कृतिक मूल्य प्राप्त झाले आहे,हे झरे त्या वास्तवाचे प्रतीकही आहेत;परंतु भूजलाच्या मुल्यामापनामध्ये मात्र या झाऱ्यांचा विचार अगदी अलीकडेपर्यंत तेवढा गांभीर्याने केला गेलेला नाही,ही वास्तवाची दुसरी बाजूही नाकारून चालणार नाही आणि म्हणूनच या स्रोतांविषयी जाणून घेणे आणि त्यांचे मापन करणे आवश्यक आहे.

भारतामध्ये अनेक पर्वतीय प्रदेशांमध्ये झरे आटण्याच्या घटकांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळत हवामानातील बदल,विशेषतः अनियमित पर्जन्यमान झऱ्यांच्या उपसार्गावर परिणाम करत आहे.झऱ्यांच्या प्रमाणात सद्यस्थिती याकरिता हवामानआधारित घटक निश्चितच कारणीभूत आहेत;परंतु त्याचबरोबर इतरही काही करणे आहेत,जी तितकीशी स्पष्ट नाहीत.

झरे हे जमिनीवरून उपसर्ग होणाऱ्या भूजलाचे मुख्य स्रोत आहेत. झऱ्यांचे पाण्याच्या अनुषंगाने रचना करण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छता आही पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांची आखणी आशा प्रकारे करणे आवश्यक आहे की,ज्यामध्ये भूगर्भीय संरचनेची गुंतागुंत आणि सामान्यपणे आढळून येणारी भूजालाधाराकांची रचना यांचा मेल घातला जातो.ज्यायोगे योजनांची परिणामकारकता वाढेल व चांगल्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले कार्यक्रम दूरगामी दुष्परिणामामुळे बंद करण्यासाठी वेळ येणार नाही.

पाण्याच्या उपलब्धेसाठी ज्याप्रमाणे भारताच्या उर्वरित भागामध्ये विहिरीसारख्या जलस्रोतांसाठी खोदकाम केले जात असल्याचे दिसून येते,त्याचप्रमाणे पर्वतीय भागांमध्ये देखील शेतीच्या उत्पादकतेमध्ये सुधारणा घडवून आणणे,पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणे आणि औद्योगिक प्रगती घडवून आणणे यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकामाची सुरुवात झालेली दिसून येत आहे.याचा परिणाम भूजलधारकांच्या समातोलावर होत असल्याचे दिसून येत आहे.झरे विहिरी हे दोन भिन्न जलस्रोत असले तरीही या दोन्ही स्रोतांचे उगमस्थान हे एकच आहे आणि ते म्हणजे भूजलधारक (Aquifer).नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या अभावापायी पर्वतांमध्ये मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या खोदाकामांमुळे भूजलाचा वापर आणि वापरकर्ते यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल.याचा परिणाम नदीचा प्रवाह कायम टिकून राहण्यावर होईलच;पण त्याचबरोबर एकाच भूजलधारकाचा शोध घेणाऱ्या दोन प्रकारच्या स्रोतांमुळे संघर्ष निर्माण होईल.