पद्मा नदी
Appearance
पद्मा नदी (बंगाली: পদ্মা নদী) ही बांगलादेशमधील एक प्रमुख नदी आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील गिरिया ह्या गावाजवळ गंगा नदीचे नैसर्गिक दुभाजन होऊन तिच्या दोन शाखा तयार होतात. ह्यापैकी एक शाखा पद्मा ह्या नावाने भारत-बांगलादेश सीमेजवळून वाहते व बांगलादेशात ब्रह्मपुत्रा व मेघना नद्यांना मिळते. गंगेची दुसरी शाखा - हूगळी नदी, दक्षिण दिशेकडे वाहते व हावडा व कोलकातामार्गे बंगालचा उपसागराराला मिळते.
दुभजनापासून बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत पद्मा नदीची लांबी सुमारे १२० किमी आहे. राजशाही हे बांगलादेशातील प्रमुख शहर पद्मा नदीच्या काठावर वसले आहे.
23°16′N 90°36′E / 23.267°N 90.600°E
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत