पट्टेरी बटलावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पट्टेरी बटलावा

पट्टेरी बटलावा, गुंडूर लावा, तिरंगाळ्या, गांजी किंवा डरु (इंग्लिश:Barred buttonquail; हिंदी:गुळु) हा एक पक्षी आहे.

पट्टेरी बटलावा आकाराने जंगल लाव्यापेक्षा लहान असतो. तो बारक्या चणीचा लावा असतो. तो वरून तांबूस पिंगट व खालून तांबडाबदामी असतो. त्याच्या हनुवटीवर, गळा, छातीवर काळे पट्टे असतात. मादी चणीने मोठी असते. ती सुरेख सुंदर रंगाची असते. गळा व छातीचा मध्यभाग काळा असतो. पाय व चोच निळी राखी असते. डोळे पांढरे सोनेरी असतात. उडताना खांद्यावर पिवळसर बदामी डाग ठळक दिसतो. गुंडूर लावा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंका या देशात दिसून येतो. तो झुडपी जंगले, गवत आणि शेतीचा प्रदेश या ठिकाणी आढळतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली