जंगली लावा
जंगली लावा | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
नर
मादा
| ||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
जंगली लावाचा आढळप्रदेश
| ||||||||||||
इतर नावे | ||||||||||||
|
जंगली लावा, गेरजा, किंवा बेरडा लावा (इंग्रजी: Jungle Bush-quail) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने मोठ्या लाव्या पेक्षा लहान असून वरून पिगट तपकिरी रंगाचा असतो. त्यावर काळ्या व बदामी रंगाचे ठिपके व पट्टे असतात. ते थव्याने जमिनीवर आढळतात .
हा पक्षी भारतात गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशात आढळतो.
वर्गीकरण
[संपादन]जॉन लॅथम यांनी १७९० मध्ये "महारट्टा प्रदेश" मधील नमुन्यांच्या आधारे जंगली लव्याचा Perdix asiatica (पर्डिक्स एशियाटिका) असे वर्णन केले होते.[१] १८३७ मध्ये ब्रायन हॉजसन यांनी हे Perdicula (पर्डिक्युला) या वंशात हलवले.[२] Perdicula हे वंशीय नाव Perdix या वंशाचे लॅटिन अल्पार्थवाचक शब्द आहे आणि त्याचा अर्थ "छोटा तीतर" आहे. asiatica हे नाव लॅटिन asiaticus मधून आले आहे आणि त्याचा अर्थ "आशियाई" आहे.[३] ह्याचे मराठीत नाव जंगली लावा आहे आणि इंग्रजीत नाव "jungle bush quail" (जंगल बुश क्वेल) आहे.[४]
निवासस्थाने
[संपादन]गवताळ आणि झुडपी जंगले तसेच दुय्यम दर्जाची पानगळीची वने .डोंगराळ भागात १२५० मिटर उंचीपर्यंत असते .
संदर्भ
[संपादन]- ^ लॅथम, जॉन (१७९०). Index ornithologicus, sive, Systema ornithologiae : complectens avium divisionem in classes, ordines, genera, species, ipsarumque varietates : adjectis synonymis, locis, descriptionibus, &c (लॅटिन भाषेत). 2. लंडन. pp. ६४९–६५०.
- ^ कॉटरेल, जी. विल्यम; ग्रीनवे, जेम्स सी.; मेयर, अर्न्स्ट; पेंटर, रेमंड ए.; पीटर्स, जेम्स ली; ट्रेलर, मेल्विन ए. (१९३४). Check-list of birds of the world (इंग्रजी भाषेत). २. केंब्रिज: हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. pp. ९७.
- ^ जोब्लिंग, जेम्स ए. (२०१०). Helm Dictionary of Scientific Bird Names. ख्रिस्तोफर हेल्म. pp. २९७, ५७. ISBN 978-1-4081-3326-2.
- ^ Gill, Frank; Donsker, David; Rasmussen, Pamela (eds.). "Pheasants, partridges, francolins – IOC World Bird List" (इंग्रजी भाषेत). 2021-07-14 रोजी पाहिले.