नीलपरी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्णन[संपादन]

नीलपरी हिमालयाच्या पायथ्याकडील भागापासून दक्षिण आशियाआग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा मध्यम आकारमानाचा पक्षी आहे. हा पक्षी साधारण २७ सें. मी. आकारमानाचा असून नर गडद निळ्या आणि काळ्या रंगाचा तर मादी फिकट निळ्या-हिरव्या रंगाची असते.

आढळस्थान[संपादन]

दक्षिण आशियात याचा आढळ सह्याद्री पर्वतरांगाजवळच्या प्रदेशात, रत्‍नागिरी ते केरळ तसेच पूर्व हिमालय आणि अंदमान आणि निकोबार येथील सदाहरित आणि मध्यम सदाहरित जंगलांत तसेच कॉफीच्या मळ्यांजवळच्या परिसरात दिसतो. नीलपरी हा मुख्यत्वे झाडावर राहणारा पक्षी असून लहान थव्यांमध्ये तसेच हरियाल, धनेश सारख्या फळे खाणाऱ्या पक्ष्यांसोबत राहतो.

विणीचा हंगाम[संपादन]

याच्या विणीचा काळ फेब्रुवारी ते एप्रिल असून यात स्थानिक बदल होतात. नीलपरीचे घरटे उंच वाढणाऱ्या झाडांवर, आडव्या पसरलेल्या काटक्यांवर शेवाळे वगैरे पसरून तयार केलेले असते. हे घरटे झाडात लपलेले असते. मादी एकावेळी गडद हिरव्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ३ अंडी देते.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]