Jump to content

चर्चा:नारद मुनी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारद मुनी हे ब्रह्म देवांच्या सात मानस पुत्रांपैकी एक .त्यानी मोठ्या कठीण तपाचरणाने ब्रह्मर्षी पद मिळविले .ते भगवान विष्णूंचे अनन्य भक्त आहेत . देवर्षी नारद सदैव धर्मप्रचार व लोक कल्याण यासाठी प्रयत्नशील असतात .शास्त्रांनी त्यांना भगवत्हृदय म्हणून संबोधले आहे .म्हणूनच सर्व युगात ,सर्व लोकात नारादांचा सतत संचार असतो.देव आणि दैत्य दोहोंनीही त्यांचा कायम आदर केलेला आहे व वेळोवेळी त्यांचा सल्ला ही घेतल्याचे दाखले प्राचीन ईतिहासात आहेत .श्रीमद्भगवद्गीतेच्या १०व्या अध्यायातील २६ व्या श्लोकात स्वत: भगवान श्रीकृष्ण नारादांची महानता सांगतांना म्हणतात देवर्षीणाम्चनारद:।म्हणजे देवर्षी मध्ये नारद ही माझी विभूती आहे . श्रीमद्भागवतातील अवतार मालिके नुसार भगवंताने तिसरा अवतार देवर्षी नारद हा धारण केला आणि सात्वत-तंत्राचा (नारद पंचरात्राचा )उपदेश केला आहे .या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळवायची याचे वर्णन आहे {संदर्भ श्रीमद भागवत स्कध १ आधाय ३ श्लो क्र.८ } वायू पुराणात देवर्षी पदाची लक्षणे सांगीतली आहेत .देवलोकात प्रतिष्टा प्राप्त करणार्या ऋषींना देवर्षी म्हणतात.त्रिकालज्ञानी,सत्यभाषणी ,आत्मसाक्षात्कारी ,कठोर तपस्वी ,गर्भावस्थेतच ज्यांचे अज्ञान दूर झाले आहे असे परम ज्ञानी ,मंत्रवेत्ते,सर्व सिद्धीप्राप्त ,सर्व लोकात संचार करण्यास सक्षम असणारे आणि नामनिष्ठ म्हणून देवत्व पावलेले जे असतात त्यांना देवर्षी म्हणतात.वायुपुराणातील देवार्शींची सर्व लक्षणे नारादांमध्ये होती म्हणूनच नारद देवर्षी म्हणून विख्यात झाले होते . मत्स्य पुराणातील माहिती नुसार नारदांनी बृह्त्कल्प प्रसंगाचे वेळी जी धर्मविषयक आख्याने /आख्यायिका संगीतल्या त्यांचा २५००० श्लोक संख्येचा महाग्रंथ म्हणजे नारदपुरण होय .१८ पुराणातील बृह्न्नारादीय पुराण किंवा नारदोक्त पुरण तेच हे नाराद्पुरण होय .प्रत्येक कीर्तनकाराने आयुष्यात एकदा या ग्रंथाचे जरूर पारायण करावे म्हणजे त्याची कीर्तन भक्ती सफल होते .आता जे मरड पुरण आहे त्यात केवळ २२००० श्लोकाच उपलब्ध आहेत .३००० श्लोकांची कमतरता प्राचीन पांडुलिपी नष्ट होण्याने झाली आहे . नारद पुराणातील ७५० श्लोक जोतिष्य शास्त्रावर आधारीत आहेत .यात जोतीष्यातील सिद्धांत ,होरा आणि संहिता यांचे सखोल विवेचन केले गेले आहे .नारदसंहिता या नावानेही एक स्वतंत्र जोतिष्य शास्त्रावरील ग्रंथ उपलब्ध आहे .नारदांचा नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ तर सर्व परिचित असाच आहे .यावरून लक्षात येते की नारद अध्यात्म ,तत्वज्ञान ,ज्योतिष्य ,आणि भक्ती या सर्वच विषयांचे अधिकारी होते . मात्र आजकाल धार्मिक मालिका आणि चित्रपटातून नारदांचे जे चरित्र चित्रण दाखविले जाते ते त्यांच्या महानतेची टिंगल टवाळी करणारे आहे .नारद हे पात्र केवळ दोन व्यक्तीत भांडण लावणारे किंवा विदुषकी विनोद करणारे असेच समाजासमोर माध्यमे प्रसिद्ध करत आहेत .एका चांगल्या नावाजलेल्या प्रकाशनाच्या शब्दकोशात नारद या शब्दाचा अर्थ 'कळलाव्या'/कलह निर्माण करणारा मनुष्य असा छापला जातो .पत्रकारांच्या फेसबुक वरील ग्रुपला 'बेरक्या उर्फ नारद 'अशी नावे दिली जातात तेंव्हा नारदीय कीर्तन परंपरेचा पाईक म्हणून मोठेच वाईट वाटते .हा नारदांच्या प्रकांड पांडित्य ,उत्तुंग व्यक्तीमत्व आणि लोकसेवेचा अपमान आहे असे मला वाटते . भगवंतांच्या अधिकांश लीलांमध्ये नारद त्यांचे सहयोगी होते .ते भगवंतांचे पार्षद होते .आणि देव पक्षाचे प्रवक्ते होते हे नारदीय कीर्तनकारांनी कधीही विसरू नये .आपण एका श्रेष्ठ परंपरेचे पाईक आहोत हे नेहमी ध्यानी ठेवावे . नारदांनी कीर्तन भक्तीस एक श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले आहे .कीर्तनकार हा नारादान्प्रमाणे प्रकांड पंडीत ,तपस्वी ,ज्ञानी,धर्मप्रचारक ,प्रभूप्रेमी आणि लोकशिक्षणाची तळमळ असणारा असावा .अशा सर्व नारदीय कीर्तनकारांना नारद जयंतीच्या पूर्वसंध्येस विनम्र अभिवादन .