आंबील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंबील करण्यासाठी ज्वारी किंवा नाचणी चे पीठ रात्री किंवा किमान १२-१५ तास भिजवुन मग त्याला शिजवितात.शिजवितांना मीठ (कोणी जीरेही ) टाकतात.आवडीप्रमाणे घट्ट वा पातळ ठेवतात.गौरी अथवा महालक्ष्मी च्या वेळेस हा पदार्थ जरूर करतातच. तो एक कुळाचार आहे.लाकडाने पेटविलेल्या चुलीवर केलेली आंबील स्वादिष्ट लागते.

गरीब लोकं/शेतकरी/कामकरी/मजुर यांना उन्हाळ्यात घराबाहेर काम करावे लागते.उन्हाळ्यात उपाशापोटी कामे केल्यास वा उन्हात घराबाहेर पडल्यास विदर्भात असलेल्या प्रखर उन्हामुळे,उन्ह लागण्याचा/ उष्माघाताचा /उष्णतेच्या विकारांचा धोका संभवितो.त्यासाठी ते पातळ आंबील(पेज) पिउनच घराबाहेर पडतात.त्यामुळे उन्हाचा त्रास नगण्य होतो.

आर्थिक परिस्थितीमुळे,जे पालक आपल्या लहानग्यास वरचे दूध देऊ शकत नाहीत, ते मुलांना आंबील पाजतात. ती पुष्टीदायक आहे.