Jump to content

नागभट्ट पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागभट्ट पहिला (अंदाजे इ.स. ७३० - इ.स. ७६०) हा आठव्या शतकातील भारताच्या मध्य भागाचा राजा होता. याला गुर्जर-प्रतिहार राजवंशाचा पहिला राजा समजले जाते. याची राजधानी उज्जैनमध्ये असून याचे राज्य सध्याच्या मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसह अनेक प्रदेशांत पसरलेले होते. याने उत्तर व मध्य भारतातील राजांच्या सहाय्याने उमायद मोहिमांचा पराभव केला होता.

राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्गाने नागभट्टाच्या साम्राज्यावर स्वारी करून त्याला पराभूत केले.