Jump to content

नाकाओमे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाकाओमे होन्डुरासमधील एक शहर आहे. व्हले प्रांताची राजधानी असलेले हे शहर नाकाओमे नदीच्या काठी वसलेले आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५८,६१२ होती. या शहराची स्थापना स्थानिक चोलुला आणि चापारास्तिक जमातींनी मिळून केली. या दोन्ही जमाती एकमेकांशी सतत लढाया करीत असत. त्याला कंटाळून दोघांनीही एकत्र राहण्याचे ठरवले व चापालुपा नदीकाठी (नाकाओमे नदीचे जुने नाव) आपली घरे बांधली. नाकाओमेचा अर्थ चोलुला आणि चापारास्तिकांच्या भाषेत दोन वंशाचे एकत्रीकरण असे आहे.

२००५मध्ये हरिकेन स्टॅनने नाकाओमे शहराचे मोठे नुकसान केले.