हरिकेन स्टॅन
Appearance
(हरिकेन स्टॅन (२००५) या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख २००५मधील चक्रीवादळ हरिकेन स्टॅन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चक्रीवादळ स्टॅन.
हरिकेन स्टॅन हे २००५ च्या अटलांटिक हरिकेन मोसमातील मोठे चक्रीवादळ होते. १-५ ऑक्टोबर, २००५ दरम्यान झालेल्या या वादळाने मध्य अमेरिकेतील देशांमध्ये प्रचंड नुकसान केले. या चक्रीवादळात १,६८८ व्यक्ती मृत्यू पावल्या व अंदाजे ४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मालमत्तेचा नाश झाला.
हे वादळ कॅरिबियन समुद्राच्या पश्चिम भागात सुरू झाले व युकातान द्वीपकल्पावरील तुलुम शहरापासून ५५ किमी दक्षिणेस जमिनीवर आले. द्वीपकल्प पार करीत काम्पीचीच्या आखातात आल्यावर या वादळाने कॅटेगरी १ च्या हरिकेनचे रूप धारण केले व मेक्सिकोतील पुंता रोका पार्तिदा या शहराजवळ जमिनीवर आले. या वादळातील वारे व पावसाने मेक्सिकोपासून ग्वातेमाला व निकाराग्वापर्यंत नुकसान केले.