Jump to content

नाईक परिवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाईक घराणे हे महाराष्ट्रातील एक राजकीय कुटुंब असून राजकीय व सामाजिकदृष्ट्या या घराण्याला भारतीय व महाराष्ट्रातील राजकारणात विशेष महत्त्व आहे. इ.स. १९५२ पासून नाईक परिवारांचा पुसदवर प्रभाव आहे.[१] आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पासून पुसदमध्ये या कुटुंबाचा प्रभाव आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांतीधवल क्रांती घडवून आणली तर , सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांती घडवून आणली.[२][३] सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रमुख मंत्रीपदासोबतच मुख्यमंत्री पद भूषविले. यासह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. या घराण्याचे सन २०१९ पर्यंत दोन सदस्य भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले आहे.

पूर्वेतिहास

[संपादन]

कुटुंबातील सदस्य

[संपादन]
 • चतुरसिंग नाईक (सामाजिक)
 • फुलसिंग नाईक (सामाजिक)
 • बाबासाहेब ऊर्फ राजूसिंग नाईक (सामाजिक)
 • वसंतराव फुलसिंग नाईक (मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, लोकसभा सदस्य)
 • सुधाकरराव नाईक (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, लोकसभा सदस्य, राज्यपाल हिमाचल प्रदेश)
 • अविनाश वसंतराव नाईक (मंत्री, महाराष्ट्र राज्य)
 • मनोहरराव राजुसिंग नाईक (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य)
 • निलय मधुकरराव नाईक (जि.प. अध्यक्ष, आमदार)
 • ययाती मनोहरराव नाईक (जि.प.उपाध्यक्ष, यवतमाळ)
 • श्रीमती अनिता मनोहरराव नाईक (नगराध्यक्षा , नगर पालिका , पुसद)
 • इंद्रनील मनोहरराव नाईक (आमदार)
 • अमेय नाईक (जि.प.सदस्य)

संदर्भ

[संपादन]
 1. ^ "पुसदची ओळख नाईक घराण्यामुळे". लोकमत. २०१४.
 2. ^ "पुसदवर नाईकांचीच छत्रछाया". यवतमाळ: महाराष्ट्र टाईम्स. २०१४.
 3. ^ "नाईक घराण्याची मोर्चेबांधणी". सरकारनामा ब्यूरो. २०१८.