चर्चा:नाईक परिवार
संकेतानुसार घराणे हे सहसा राजवंश किंवा संगीतातील पारंपारिक गुरु-शिष्यांच्या समूहास दिलेले शीर्षक असते. -- अभय नातू (चर्चा) ११:३२, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Govr1:, येथील नोंद वाचा. वरचेवर इतरांची संपादने परतवू नका.
- अभय नातू (चर्चा) ०९:५८, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
संदर्भ असतांना वारंवार संपादन उलटण्याचा थांबवावे.
[संपादन]कोणताही लेख लिहीताना संपादकाला मेहनत अभ्यास लागतो. याचे कृपया भान ठेवावे. हेतुपुरस्सर माझ्या संपादनाला उलटू नये. जे मी शब्द किंवा विधानाचा उल्लेख केला आहे. त्याचे संदर्भ मी जोडले आहे. विनाकारण त्रास देऊ नये. Govr1 (चर्चा) १०:०५, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
- रावसाहेब,
- कोणताही लेख लिहीताना संपादकाला मेहनत अभ्यास लागतो. याचे कृपया भान ठेवावे.
- मला उद्देशून हे लिहिण्याआधी तुम्ही तुमची संपादने, त्यांची व्याप्ती आणि माझी संपादने यांना तोलले असते तर तुमची भाषा जरा मवाळ झाली असती.
- वर संदेश दिलेला आहे. वाचलात? वर्तमानपत्राने या कुटुंबाचा उल्लेख घराणे केला म्हणजे सगळ्या जगाने त्यांचे नामकरण स्वीकारावे हे साफ चूक आहे.
- येथे येउन अनेक ठिकाणी संकेत, नियम धाब्यावर बसवून संपादने उलटवण्याचा कार्यक्रम तुम्ही राबविलेला आहे. अनेक वेळा सूचना, मदत, विनंती करुन हे न थांबवता तुम्ही अद्याप हे चालूच ठेवले आहे. हे लगेचच थांबवावे.
- अभय नातू (चर्चा) १०:१४, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
भाषा जरा जपून वापर. विकिपीडियाची प्रतिष्ठा कायम रहावी. हेतुपुरस्सर चाललेली मक्तेदारी ही चूकीची आहे. चर्चा थांबव आता. Govr1 (चर्चा) १७:२३, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
@Govr1:, चक्क एकेरी भाषा? तेही फक्त तुमची मनमर्जी चालावी म्हणून? तुम्ही जे लिहिताय ते सार्वजनिक आहे, सर्वांना दिसतेय. अगदी पहिल्याच दिवशी पासून तुम्ही तुम्हाला जो आवडला नाही, त्याला दूषणे द्यायला सुरुवात केलीत. तुमच्या या मनमर्जीवर जर तुम्ही संयम राखला असता तर आज अनेकजण तुम्हाला येथे मदतीला आले असते. पण तुम्ही विकिपीडियाचे नियम सांगितले की, त्याला वेगवेगळी दूषणे जोडलीत. साधा प्रश्न आहे की, तब्बल ३२५+ भाषेत असणारी जागतिक विकिपीडिया स्वतःचे नियम केवळ तुमच्यासाठी का मोडेल, काही विशेष कारण? आता निश्चितच तुम्ही मला पण शिव्या घालणार आहात का? का विचारपूर्वक नियमांना धरून लिखाण करणार आहात? निर्णय आपला- संतोष गोरे ( 💬 ) १८:४२, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
एकेरी भाषाचा विषय नाही.मला विनाकारण त्रास देणे सुरू आहे. जेथे काही कमतरता असेल तिथे मदत करायला हवी. मार्गदर्शकाची संवादी भूमिका असावी. याऊलट चुकीचे साचे. तर विधान उलटविल्या जात आहे. संदर्भ देऊनही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नाईकसाहेब हे महापुरुष आहेत. या घराण्यातील दोन दोन महापुरुषांची जयंती स्मृतिदिन शासन स्तरावर साजरा होते.ज्यांनी ज्यांनी समाज, राष्ट्रासाठी योगदान दिले आहे, अशा व्यक्ती किंवा त्या संबंधित विष याविषयी उपरोधिक बोलणे, हे महापुरुषाचे अवमान नाही का? महापुरुषाला जाती धर्म किंवा प्रदेशाच्या दृष्टीने बघू नये. विकिपीडियाचा आदर सन्मान करावे, तितके कमी आहे, ज्यांनी सुंदर मंच दिले आहे. लेखक, सदस्य किंवा संपादक कोणत्या विषयावर लिहावे, हा त्यांचा अधिकार आणि आवड आहे. मी संवादी आणि संयमी भूमिकेतूनच संपादन करीत आहे. चर्चा थांबवावी. विनाकारण वाद नको. Govr1 (चर्चा) १९:१४, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Govr1:,
- भाषा जरा जपून वापर.
- अहो काका, जरा तोंड सांभाळा. काय वाट्टेल ते लिहिले आणि वाट्टेल ते संदर्भ दिले की ते खरे होत नाही. तुम्हाला येथील संकेत कळत नाहीत आणि ते कळून घेण्याची तुमची दानतही नाही हे उघड आहे.
- एकेरी भाषाचा विषय नाही.
- एकेरी भाषा काढली आणि आता विषय नाही हे कानावर हात ठेवणे हास्यास्पद आहे. अहो, एकाच पानावर दोन्ही विधाने आहेत. तुमचा दुटप्पीपणा कळायला फारसा प्रयत्न लागत नाही आहे.
- मला विनाकारण त्रास देणे सुरू आहे.
- हा कांगावा अनेक दिवस चालू आहे. प्रत्येक कृतीमागे कारण दिले असताना त्यावर चर्चा न करता मुद्दामहून तिसरीकडे चर्चा नेणे हे तुमचे ब्रीद आहे. त्याने इतरांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही हे पाहिल्यावर अपमान करणे सुरू केलेले दिसत आहे.
- जेथे काही कमतरता असेल तिथे मदत करायला हवी. मार्गदर्शकाची संवादी भूमिका असावी.
- जेव्हा मागितली तेव्हा मदत केली. अनेकदा न मागताही मदत केली. आणि तरी तुमची मात्र तू-तू-मी-मी चालूच आहे. येथे अनेक लोकांना मी (आणि इतर अनेक सदस्य) सतत मदत करीत असतो. गेल्या तीन दिवसांत दोन लोकांना अनेक तास घालवून त्यांची समस्या सोडवली. का? कारण -- १. ते हेकटपणा न करता मराठी विकिपीडिया सुधारण्यास झटत आहेत. २. त्यांनी प्रयत्न करुनसुद्धा न जमल्यावर त्यांनी हाक घातली. ३. त्यांची भाषा, पवित्रा सभ्य आहे.
- डझनावारी लोकांना येथे त्रास नाही आणि फक्त तुम्हाला? याचे कारण तुम्हाला फक्त आरशात दिसेल.
- ...या घराण्यातील दोन दोन महापुरुषांची जयंती ....'अशा व्यक्ती किंवा त्या संबंधित विष याविषयी उपरोधिक बोलणे, हे महापुरुषाचे अवमान नाही का?', इ. इ.
- लागले परत तिरपागडे बोलायला. अहो भाऊसाहेब, एकदा तरी असे लिहिलेले दाखवा. खोटे बोलणे थांबवा. लगेचच.
- सदस्य किंवा संपादक कोणत्या विषयावर लिहावे, हा त्यांचा अधिकार आणि आवड आहे.
- म्हणून येथीन नियमांची ऐशीतैशी करुन वाट्टेल ते बरळायचे ('भाषा जरा जपून वापर)?? पुन्हा एकदा आठवण - शेकडो संपादकांनी अनेक वर्षे अहोरात्र मेहनत करुन मराठी विकिपीडिया आकारास आणलेला आहे. उगाच इतस्ततः लिखाणाचे बार सोडणाऱ्यांनी नाही.
- चर्चा थांबवावी.
- पुन्हा एकदा -- पूर्णपणे तुमच्याच हातात.
- यापुढे मराठी विकिपीडियावरील संकेत व नियमांचा अवमान करु नये, कांगावा करू नये, नसते आरोप करू नयेत तसेच सदस्यांशी अपमानकारक भाषेत बोलू नये ही सूचना (विनंती नव्हे).
- अभय नातू (चर्चा) २१:४५, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
आता अधिक बोलू नका. खूप झाले. चर्चा थांबवा. Govr1 (चर्चा) २२:३३, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
- आता अधिक बोलू नका. खूप झाले.
- अति करुन मग पुन्हा एकदा सल्ले? वा, छान.
- चर्चा थांबवा.
- पुन्हा एकदा -- पूर्णपणे तुमच्याच हातात.
- अभय नातू (चर्चा) २३:०७, २० नोव्हेंबर २०२१ (IST)