हरितक्रांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अधिक उत्पन्न देणारी बियाणी, रासायनिक खते, कीटकनाशके इ. आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या हरितक्रांतीमुळे दुसर्‍या महायुद्धानंतरच्या तीनेक दशकांत जगभरातील शेतकी उत्पादन वाढले.

जगभरातील कृषिउत्पन्नवाढीस कारणीभूत ठरलेल्या इ.स. १९४० ते इ.स. १९७० या कालखंडादरम्यान घडलेल्या शेतकी संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या कार्यक्रमांच्या मालिकेस हरितक्रांती या नावाने उल्लेखले जाते.

भारतातील हरितक्रांती[संपादन]

इ.स. १९६०च्या दशकात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषिउत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणारे जातींची बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण इत्यादी मार्गांवर यात भर देण्यात आला. भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम.एस. स्वामिनाथन यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉगांना भारतात बोलावले. अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन आणि भारती केंद्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचे बियाणे आयात करण्यात आले. पाण्याची मुबलक उपलब्धता व शेतकीची सफल पार्श्वभूमी यांमुळे भारतीय केंद्रशासनाने नवी पिकांच्या प्रयोगांसाठी पंजाबची निवड केली. अधिक उत्पन्न देणारी बियाणी व जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मात्र कालौघात रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनींवर विपरीत परिणाम झाले[ संदर्भ हवा ].

महाराष्ट्रातील हरितक्रांती[संपादन]

महाराष्ट्रातील हरित क्रांतीची सुरवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.