नाईक परिवार
Appearance
(नाईक घराणे या पानावरून पुनर्निर्देशित)
नाईक घराणे हे महाराष्ट्रातील एक राजकीय कुटुंब असून राजकीय व सामाजिकदृष्ट्या या घराण्याला भारतीय व महाराष्ट्रातील राजकारणात विशेष महत्त्व आहे. इ.स. १९५२ पासून नाईक परिवारांचा पुसदवर प्रभाव आहे.[१] आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पासून पुसदमध्ये या कुटुंबाचा प्रभाव आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती व धवल क्रांती घडवून आणली तर , सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांती घडवून आणली.[२][३] सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रमुख मंत्रीपदासोबतच मुख्यमंत्री पद भूषविले. यासह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. या घराण्याचे सन २०१९ पर्यंत दोन सदस्य भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले आहे.
पूर्वेतिहास
[संपादन]कुटुंबातील सदस्य
[संपादन]- चतुरसिंग नाईक (सामाजिक)
- फुलसिंग नाईक (सामाजिक)
- बाबासाहेब ऊर्फ राजूसिंग नाईक (सामाजिक)
- वसंतराव फुलसिंग नाईक (मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, लोकसभा सदस्य)
- सुधाकरराव नाईक (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, लोकसभा सदस्य, राज्यपाल हिमाचल प्रदेश)
- अविनाश वसंतराव नाईक (मंत्री, महाराष्ट्र राज्य)
- मनोहरराव राजुसिंग नाईक (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य)
- निलय मधुकरराव नाईक (जि.प. अध्यक्ष, आमदार)
- ययाती मनोहरराव नाईक (जि.प.उपाध्यक्ष, यवतमाळ)
- श्रीमती अनिता मनोहरराव नाईक (नगराध्यक्षा , नगर पालिका , पुसद)
- इंद्रनील मनोहरराव नाईक (आमदार)
- अमेय नाईक (जि.प.सदस्य)
संदर्भ
[संपादन]- ^ "पुसदची ओळख नाईक घराण्यामुळे". लोकमत. २०१४.
- ^ "पुसदवर नाईकांचीच छत्रछाया". यवतमाळ: महाराष्ट्र टाईम्स. २०१४.
- ^ "नाईक घराण्याची मोर्चेबांधणी". सरकारनामा ब्यूरो. २०१८.