नयना लाल किडवाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नयना लाल किडवाई यांचा क्रमांक जगातील ५० सर्वोच्च व्यावसायिक स्त्रियांमध्ये ३४वा आहे. फॉर्च्यून मासिकाच्या यादीनुसार त्या आशियातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या हुशार व्यावसायिक महिला आहेत.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


एका प्रसिद्ध विमा कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पित्याच्या घरात नयना लाल किडवाई यांचा जन्म इ.स. १९५७ मध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण सिमला येथे तर कॉलेजचे शिक्षण दिल्ली विश्वविद्यालयात झाले. तिथे अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर लंडनच्या हॉर्वर्ड स्कूल ऑफ बिझिनेसमधून त्या एम बी ए झाल्या. त्याच वर्षी त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. यापूर्वी त्यांच्या घराण्यात कुठल्याही स्त्रीने नोकरी केली नव्हती. त्यामुळे त्यांना सुरुवातीला नातेवाइकांच्या निषेधाला तोंड द्यावे लागले. त्या काळात जिचा आदर्श समोर ठेवावा अशी कोणतीही स्त्री भारतीय कंपनी क्षेत्रात दिसत नव्हती. पण गोलगोल फिरणाऱ्या खुर्चीत बसणाऱ्या आपल्या वडिलांसारखे एखाद्या व्यापारी कंपनीची प्रमुख व्हावे, ही नयना लाल यांची मनीषा होती. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेनंतर नयनाबाई मॉर्गन स्टॅनलेमध्ये काम करू लागल्या, आणि काही काळानंतर ती नोकरी सोडून त्या हाँगकाँग ॲन्ड शांघाय बँकिंग कॉरपोरेशनमध्ये गेल्या.

हाँगकाँग बँकेत राहून त्यांनी त्या बँकेला इन्व्हेस्टमेन्ट बँक म्हणून उच्च स्थानावर नेले. त्यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत झाली. इ.स.२००६ साली त्यांचे नाव वॉल स्ट्रीट या जगप्रसिद्ध शेअर मार्केटमध्ये घेतले जाऊ लागले. त्यांच्यामुळेच परकीय बँकांपैकी भारतीय उद्योगधंद्यांत गुंतवणूक कराणारी हाँगकाँग बेंक ही पहिली बँक ठरली. नयना किडवाई यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत २२ परदेशी शहरांमध्ये या बँकेच्या ४३ शाखा उघडल्या आहेत. सध्या त्या हाँगकाँग ॲन्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनच्या कंट्री हेड ऑफ इंडिया आणि डायरेक्टर आहेत.

श्रीमती नयना लाल किडवाई यांचा वार्षिक तनखा अंदाजे दोन कोटी रुपये आहे.