Jump to content

द अदर साइड ऑफ सायलेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द अदर साइड ऑफ सायलेन्स (mr)
द अदर साइड ऑफ सायलेन्स 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

द अदर साइड ऑफ सायलेन्स : व्हॉइसेस फ्रॉम द पार्टीशियन ऑफ इंडिया[] हे उर्वशी बुटालिया[] द्वारा लिखित व पेंगविन इंडिया द्वारा १९९८ मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे. एका परीक्षणात लिहिल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे मानवी शोकांतिकेच्या भयावह आठवणींची कथने आहेत.

प्रस्तावना

[संपादन]

भारताच्या फाळणीचा घटना क्रम हा अजून इतिहासाचा संपलेला धडा नाही असे लेखिकेच्या लक्षात आणुन देणाऱ्या घटना आणि अनुभवांच्या निवेदनाने पुस्तकाची सुरुवात होते. राजकीय फाळणीमुळे आपल्यामध्ये अंतर निर्माण झाले आहे ते अजून आपल्यातच आहे. ही गोष्ट कधी काळी घडली होती, किंवा ती दुसऱ्या कोणाची तरी आहे असे आता आपण म्हणू शकत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात १९८९ साली भागलपूर येथे झालेल्या जातीय दंगलींबद्दल बोलत लेखिका सांगते कि, फाळणीच्या वेळी मुस्लिमांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, हिंदू बायकांवर बलात्कार केले. याच्या प्रक्षोभक आठवणींचा अत्यंत निवडक उपयोग दंगलखोराणी केला. यावरूनच असे लक्षात येते कि फाळणीच्या जखमा भरून आलेल्या नाहीत. त्याकाळी निर्माण झालेली कटुता अजूनही वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात आहे.

बहुतांश फाळणीचा लिखित इतिहास फाळणीचा राजकीय पैलुंशी संबंधित आहे. उदाहरणार्थ फाळणीच्या राजकीय इतिहास परंतु फाळणीच्या इतिहासातील मानवी पैलुंकडे आधिक लक्ष दिले पाहीजे असे लेखिका म्हणते. फाळणी ही केवळ भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी नव्हती तर फाळणीतुन तगून आलेले लोक सांगतात की, ती मानसिक फाळणी होती. या पुस्तकात खालील गोष्टींवर भर दिलेला आहे.

  1. कुटुंबे कशी विभागली गेली.
  2. सीमेपारचे मैत्रीचे संबंध कसे टिकवले गेले.
  3. लोकानी या भीषण दुःखाला तोंड देऊन आपली आयुष्ये पुन्हा कशी उभी केली.
  4. विस्थापनाच्या त्यांच्या अनुभवातुन त्यांची आयुष्ये कशी उभी राहिली.

ठळक मुद्दे

[संपादन]

अशा रीतीने या पुस्तकात लेखिकेने लिखित इतिहासात दूर्लक्षिली गेलेली/ दूर्लक्षिल्या गेलेल्या सामान्य माणसांच्या, [स्त्री|स्त्रियांच्या]], मुलांच्या आणि खालच्या जातींच्या आत्मकथनांचा दस्तावेज आहे. यासाठी लेखिकेने गतकाळातील आठवणींचा साधन म्हणुन वापर केला आहे. आठवणींवर त्या आठवणी कोणाच्या आहेत, केंव्हाच्या आहेत आणि कशा आहेत याचा प्रभाव असतो हे लेखिका मान्य करतात. फाळणीच्या आठवणी जमा करताना लेखिकेने विचारलेले प्रश्न असे/ खालील प्रमाणे:

  1. अजुनही हिंदुंच्या आणि शीखांच्या दुसऱ्या/तिसऱ्या पिढीतही “आपण” आणि “ते” अशी विभागणी आढळते. खरतर यांच्यापैकी अनेकांना कुटुंबाच्या आणि समाजाच्या फाळणीच्या आठवणींशी काही संबंध नाही.
  2. कोणत्या आठवणी जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या जातात किंवा विसरल्या जातात. संघर्षाच्या आणि भीतीच्या आठवणी लक्षात ठेवुन सहद्र्पूर्ण संबंधांच्या आठवणी का दडवल्या जातात.

पुस्तकाच्या वेगवेगळ्या विभागातुन मुलाखती आणि काही अधिकृत तर काही सर्वसाधारण कागदपत्रातून बुटालिया खालील गोष्टी नोंदविता:

  • आठवणींची प्रक्रिया
  • मौखिक इतिहासाचा उपयोग.

फाळणीच्या इतिहासाबद्दल इतके मौन का पाळले गेले आहे या बद्दल लेखिका शेवटच्या प्रकरणात लिहितात. पददलितांच्या फाळणीच्या इतिहासाची मुख्य विचारधारा मौन आहे. म्हणुनच मुख्य धारेच्या पलिकडे आलेल्या फाळणीच्या इतिहासामध्ये केवळ बळी नसुन ते कर्तेकरविते सुद्धा आहेत.अशी बाजु या पुस्तकात मांडल्यामुळेच पुस्तकाचे नाव “अदर साईड ऑफ साईलेन्स” असे आहे. जानकी नायर[] यांच्या “द ट्रबल रिलेशनशिप ऑफ फेमिनिझम अँड हिस्टरी” या लेखात म्हणतात, इतिहासाचा प्रवास जागोजागी स्त्रीवादी दृष्टीकोनाने प्रभावित केल्याचे जाणवते.राजकीय आणि बौद्धिक कामे करणाऱ्या स्त्रीवाद्यांच्या लिखाणांचा मागोवा नायर घेतात. नायर यांच्या मते फाळणीचा इतिहास लिहिणाऱ्या ‘उर्वशी बुटालिया’ एका अर्थाने फाळणीचा निषेध करतात. कारण त्यांच्या मते फाळणी अजुनही लोकांच्या मनात जिवंत आहे.

प्रतिक्रिया/योगदान

[संपादन]

इंटरनॅंशनल जर्नल ऑफ हिंदू स्टडीज म्हणते की स्त्रियांच्या शरिरावर फाळणीमुळे झालेले अत्याचार अधोरेखित करण्यात यशस्वी झालेले आहेत. कथनातून फाळणीबद्दलच्या अनेक गोष्टी उघड होतात, उदा. शीख गावकऱ्यांनी केलेेले हिंसाचार. न्यू यॉर्क टाईम्सने परीक्षणात असे म्हंटले आहे की, बुटालिया यांनी या पुस्तकात अदभुत साहित्य जमा केले आहे. फाळणीतील स्त्रियांच्या सहभागाबद्दल काही नव्या गोष्टी त्या आपल्याला सांगतात तसेच त्या खालच्या जातीतील व्यक्ती आणि मुलांबद्दल करतात. त्यासाठी त्यांनी प्रदीर्घ मुलाखती घेतल्या आहेत.[] जर्नल ऑफ रॉंयल एशियाटिक सोसायटी म्हणते की, जर मौनाला भाषा देणे जर स्त्रीवादी अभ्यासाचे प्रमुख वैशिष्ट्ये मानायचे असेल तर, अदर साईड हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Butalia, Urvashi (2000). The Other Side of Silence: Voices from the Partition of India (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 0822324946.
  2. ^ "Urvashi Butalia | Author | Zubaan". zubaanbooks.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-01 रोजी पाहिले.
  3. ^ Nair, Janaki (2008). "The Troubled Relationship of Feminism and History". Economic and Political Weekly. 43 (43): 57–65.
  4. ^ "The Other Side of Silence". archive.nytimes.com. 2018-04-01 रोजी पाहिले.
  5. ^ Perron, Lalita du (2002/11). "The Other Side of Silence: Voices from the Partition of India. By Urvashi Butalia. pp. xiv, 310. London, Hurst & Co., 2000". Journal of the Royal Asiatic Society (इंग्रजी भाषेत). 12 (3): 390–392. doi:10.1017/s1356186302350363. ISSN 1474-0591. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)