आनंद कुमार
आनंद कुमार (१ जानेवारी, इ.स. १९७३ पाटणा; बिहार - हयात) हे भारतीय गणितज्ञ आहेत. हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम बिहारमध्ये 'सुपर-३०' या नावाने ते चालवितात.
इ.स. १९९२ साली आनंदकुमारांनी 'रामानुजन स्कूल आॅफ मॅथेमॅटिक्स' ही संस्था सुरू केली. या संस्थेकडून मुलांची चाचणी घेऊन त्यातून ३० जणांची निवड केली जाते व त्यांना आयआयटी प्रवेश व इतर अनेक परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. डिस्कव्हरी वाहिनीने त्यांच्या या गणित वर्गावर एक तासाचा कार्यक्रम केला होता.
आनंदकुमारांचे गणितातील शोधनिबंध 'मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम' व 'द मॅथेमॅटिकल गॅझेट' या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत.
पुरस्कार
[संपादन]इ.स. २०१४ साली राजकोट येथे झालेल्या गणित संमेलनात आनंदकुमार यांना 'श्रीनिवास रामानुजन पुरस्कार' देण्यात आला. स्वामी ब्रम्हानंद पुरस्कार