देव पटेल
देव पटेल | |
---|---|
२०२४मध्ये पटेल | |
जन्म |
२३ एप्रिल, १९९० हॅरो, लंडन, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | युनायटेड किंग्डम |
वांशिकत्व | भारतीय |
नागरिकत्व | युनायटेड किंग्डम |
प्रसिद्ध कामे | स्लमडॉग मिलियोनेर, द बेस्ट एक्झॉटिक मेरीगोल्ड होटेल, लायन, होटेल मुंबई |
पुरस्कार | यादी |
देव पटेल (२३ एप्रिल, १९९०:हॅरो, लंडन, इंग्लंड - ) हा एक ब्रिटिश अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि अकादमी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकनांसह त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. टाइमच्या २०२४मधील जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पटेल यांचा समावेश करण्यात आला होता.
पटेलने आपल्या कारकिर्दीची दूरचित्रवाणीमालिका स्किन्स (२००७) मध्ये अन्वर खररलची भूमिका केली. डॅनी बॉईलच्या स्लमडॉग मिलियोनेर (२००८) या चित्रपटातील भूमिकेसाठी[१] त्याला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. [२] द बेस्ट एक्झोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०११) आणि द सेकंड बेस्ट एक्झोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१५) यांत त्याने भूमिका केल्या.
२०१६ च्या लायन चित्रपटातील भूमिकेसाठी, पटेल यांनी सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार जिंकला आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांने हॉटेल मुंबई (२०१८), द पर्सनल हिस्ट्री ऑफ डेव्हिड कॉपरफिल्ड (२०१९) आणि द ग्रीन नाइट (२०२१) या स्वतंत्र चित्रपटांमध्ये काम केले आणि मंकी मॅन (२०२४) या थरारपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.
पटेल यांचा जन्म २३ एप्रिल, १९९० रोजी लंडनच्या हॅरो भागात झाला. [३] [४] त्याचे आईवडील नैरोबीमध्ये जन्मलेले आणि भारतीय वंशाचे आहेत. हे दोघे गुजराती असून किशोरवयात वेगवेगळ्या मार्गे युनायटेड किंग्डमला स्थलांतरित झाले. [५] [६] [७] [५] पटेल हिंदू धर्मात वाढले होते. [८] तो मोडकेतोडके गुजराती बोलतो. [९] त्यांचे पूर्वज भारतातील गुजरात राज्यातील जामनगर आणि उंझा येथून आले होते. [१०]
वैयक्तिक जीवन
[संपादन]पटेलने २००९मध्ये त्याची स्लमडॉग मिलेनियर मधील सहअभिनेत्री फ्रीडा पिंटोला डेट करायला सुरुवात केली [११] १० डिसेंबर, २०१४ रोजी सुमारे सहा वर्षांनी ते वेगळे झाले. [१२]
मार्च २०१७ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन अभिनेत्री टिल्डा कोभम-हर्वेसोबत आपले नाते जाहीर केले. नऊ महिन्यांपूर्वी हॉटेल मुंबईच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. [१३] २०२२ मध्ये ते कॉभॅम-हेर्वेच्या मूळ गावी दक्षिण ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे गेले असताना [१४] तेथील गल्लीतील मारामारी सोडवल्यानंतर स्थानिक बातम्यांमध्ये ते जाहीर झाले होते. [१५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Dev Patel on the Struggle of Finding Roles After 'Slumdog Millionaire'". United States: ABC News. 20 May 2020 रोजी पाहिले.
- ^ Moore, Matthew (15 January 2009). "Baftas 2009: Slumdog Millionaire nominated for 11 awards as Oscars momentum builds". The Daily Telegraph. London. ISSN 0307-1235. 11 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Dev Patel". indobase.com. 23 April 1990. 8 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Dev Patel Biography". Tribute. 15 May 2014 रोजी पाहिले.
- ^ a b Burrows, Tim (1 December 2008). "Slumdog Millionaire: Dev Patel hits the jackpot". The Daily Telegraph. London. 11 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 March 2009 रोजी पाहिले.
- ^ Tilley, David (20 January 2009). "Slumdog Millionaire starring Dev Patel scoops nine Oscar nominations". Harrow Observer. 14 February 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 March 2009 रोजी पाहिले.
- ^ Iqbal, Nosheen (21 February 2015). "Dev Patel: 'I didn't know what I was getting myself into'". The Guardian. 6 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "Dev Patel proud of quirks". NZ City. 10 August 2010. 7 October 2010 रोजी पाहिले.
- ^ Jain, Atisha (3 May 2016). "My self-esteem is way too low to call myself a star yet: Dev Patel". Hindustan Times.
- ^ Jain, Ankur (28 January 2009). "Young 'Slumdog' hails from Kutch". The Times of India. Ahmedabad.
- ^ Susan Wloszczyna (29 March 2011). "Freida Pinto, Dev Patel: Like something out of a movie". USA Today. 26 February 2012 रोजी पाहिले.
- ^ Marquina, Sierra (10 December 2014). "Freida Pinto, Dev Patel Split After Almost Six Years Together -- Get All the Details". Us Magazine. 13 December 2014 रोजी पाहिले.
- ^ Penny Debelle (1 March 2017). "Lion star Dev Patel and Tilda Cobham-Hervey now Hollywood's hottest couple". The Advertiser. 14 October 2017 रोजी पाहिले.
- ^ Gilchrist, Ava (3 August 2022). "Dev Patel And Actress Tilda Cobham-Hervey Have A Fairytale Relationship, Here's How It Started". Elle Australia. 8 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Dev Patel: Actor breaks up knife fight in Australia". BBC News. 3 August 2022. 17 February 2024 रोजी पाहिले.