हॅरो (लंडन)
हॅरो | ||||||
---|---|---|---|---|---|---|
उजवीकडून खाली: सेंट जॉन द बॅप्टिस्ट, ग्रीनहिल चर्च; स्किपिंग केटी पुतळा; वेस्टमिन्स्टर विद्यापीठ; हायजेइया इमारत आणि किंग्स हाउस | ||||||
Location within the United Kingdomसाचा:Infobox UK place/NoLocalMap | ||||||
लोकसंख्या | १,४९,२४६ (२०११ जनगणना)[१] | |||||
ऑर्डनन्स सर्वे नॅशनल ग्रिड | TQ145885 | |||||
• चॅरींग क्रॉस | ११ मैल (१८ किमी) ESE | |||||
ग्रेटर लंडन | ||||||
देश | इंग्लंड | |||||
Sovereign state | युनाइटेड किंगडम | |||||
पोस्ट टाऊन | हॅरो | |||||
जिल्ह्याचा पोस्ट कोड | HA1, HA2, HA3 | |||||
डायलिंग कोड | ०२० | |||||
पोलिस | ||||||
अग्निशमन सेवा | ||||||
रुग्णवाहिका | ||||||
इंग्लंडची संसद | ||||||
हॅरो ( /ˈhæroʊ/ [२] ) हे इंग्लंडमधील ग्रेटर लंडनमधील एक मोठे शहर आहे आणि लंडन बरो ऑफ हॅरोमधील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर चेरिंग क्रॉसच्या वायव्येस सुमारे ९.५ मैल (१५.३ किमी) आणि वॅटफोर्डच्या दक्षिणेस ५.४ मैल (८.७ किमी) अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या [३] १,४९.२४६ तर याच नावाच्या बरोची लोकसंख्या २,५०,१४९ इतकी होती.
हॅरो शहराचे मूळ हॅरो हिल या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या हॅरो ऑन द हिल या खेड्यात आहे. १२४ मी (४०८ फूट) उंचीच्या या टेकडीच्या पायथ्याशी मेट्रोपॉलिटन रेल्वेवरील हॅरो-ऑन-द-हिल स्थानक उघडल्यानंतर येथील विकास सुरू झाला. आधुनिक हॅरो शहराचे केंद्र टेकडीच्या ग्रीनहिल नावाच्या परिसरात विकसित झाले. [४] २०व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तरेकडे पसरत चाललेल्या लंडन शहराच्या उपनगरांना मेट्रोलँड असे म्हणत असत आणि हॅरो त्याची अनधिकृत राजधानी समजली जात असे. [५] यानंतर १८३७मध्ये वेस्ट कोस्ट मेन लाइनवरील हॅरो अँड वेल्डस्टोन स्थानक सुरू झाले. हे शहरापासून ते १.५ मैल (२.४ किमी) अंतरावर टेकडीच्या उत्तरेस होते. [६] वेल्डस्टोनमध्ये अनेक कारखाने सुरू झाल्याने कामगार या क्षेत्राकडे आकर्षित झाले; [७] हॅरोमध्ये कोडॅक कंपनीचा मोठा कारखाना होता. येथे छायाचित्रांसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती आणि संशोधन होत असे. हा कारखाना शतकाहून अधिक काळ येथे टिकला.
हॅरोमध्ये हॅरो स्कूल ही प्रसिद्ध शाळा आहे. १५७२मध्ये याची स्थापना मुलांसाठी एक स्वतंत्र बोर्डिंग स्कूल म्हणून झाली. हॅरो स्कूल जगातील सर्वोत्तम माध्यमिक शाळांपैकी एक मानली जाते. [८] जवळची जॉन लायन स्कूल ही मुलांची दुसरी स्वतंत्र शाळा आहे तर मुलींसाठीची नॉर्थ लंडन कॉलेजिएट स्कूल एजवेर बरोमध्ये आहे.
वाहतूक
[संपादन]हॅरोला लंडनच्या अनेक अंडरग्राउंड आणि राष्ट्रीय रेल्वे सेवांद्वारे सेवा दिली जाते:
- हॅरो-ऑन-द-हिल ( मेट्रोपॉलिटन लाईन आणि आयलेसबरी लाईन / चिल्टर्न रेल्वे ) (शहराचे मुख्य स्थानक)
- हॅरो आणि वेल्डस्टोन (बेकरलू लाइन, लंडन ओव्हरग्राउंड, लंडन नॉर्थवेस्टर्न रेल्वे आणि सदर्न)
- वेस्ट हॅरो (मेट्रोपॉलिटन लाइन)
- दक्षिण हॅरो (पिकॅडिली लाइन )
- रेनर्स लेन (मेट्रोपॉलिटन/पिकॅडिली लाईन्स)
- नॉर्थ हॅरो (मेट्रोपॉलिटन लाइन)
- केंटन (बेकरलू लाइन आणि लंडन ओव्हरग्राउंड)
- हेडस्टोन लेन (लंडन ओव्हरग्राउंड)
- नॉर्थॉल्ट पार्क (चिल्टर्न मेन लाइन / चिल्टर्न रेल्वे) [ईलिंग आणि हॅरोच्या सीमेवर]
- सडबरी हिल हॅरो (चिल्टर्न मेन लाइन /चिल्टर्न रेल्वे)
- नॉर्थविक पार्क (मेट्रोपॉलिटन लाइन) [ब्रेंट आणि हॅरो दरम्यानच्या सीमेवर]
- सडबरी हिल (पिकाडिली लाइन)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "2011 Ward Census". data.london.gov.uk. 22 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 June 2014 रोजी पाहिले.
- ^ Wells, John C. (2008). Longman Pronunciation Dictionary (3rd ed.). Longman. p. 368. ISBN 9781405881180.
- ^ Harrow on the Hill, Harrow Weald, Headstone, North Harrow, Kenton, Rayners Lane, South Harrow, Wealdstone and West Harrow.
- ^ "Heathfield School Harrow". Patfield.com.
- ^ Forrest, Adam (10 September 2015). "Metroland, 100 years on: what's become of England's original vision of suburbia?". The Guardian.
- ^ "10 Oldest Train Stations in the World". Oldest.org. 10 September 2020.
- ^ "BBC - A History of the World - Object : Whitefriars Glass". www.bbc.co.uk.
- ^ "European Education Briefing Memo - September". Superintendentsforum.org. 23 October 2021 रोजी पाहिले.