देऊर कोठार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देऊर कोठार हे मध्य भारतातल्या मध्य प्रदेशातील पुराणवस्तुसंशोधनाचा दृष्टीने महत्त्वाचे असे एक ठिकाण आहे. हे गाव तेथील बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे. १९८२ साली संशोधकांना या ठिकाणाचा शोध लागला. हे स्तूप मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेले बौद्ध स्तूप आहेत.

इतिहास[संपादन]

रेवा जिल्ह्यातील कतरा नावाच्या खेड्यापासून नैऋत्य दिशेला ५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. रेवा - अलाहाबाद मार्गावरील रेवा शहरापासून हे ठिकाण ७५ किलोमीटर अंतरावर आहे. देउर कोठार मधील स्तूप ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक यांनी स्थापलेले असल्याचे समजले जाते. प्राचीन काली हे ठिकाण दक्षिण पथावर म्हणजे दक्षिणेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर होते. हा मार्ग पाटलिपुत्र पासून म्हणजे आजच्या पटणापासून निघून मध्य भारतातून जात, महाराष्ट्रातील प्रतिष्ठानपर्यंत, पूर्व-पश्चिम असा जाणारा होता. सांची, सागर, कौशंबी आणि सारनाथ अशा प्रसिद्ध बौद्ध स्थानांच्या मध्यभागी हे खेडे असल्याने, बौद्ध भिक्खू या देउर कोठारला वरचेवर जात असत.

शोध व उत्खनने[संपादन]

शिल्पशास्त्र[संपादन]

कोरीव मजकूर[संपादन]

विनाशाचे कारण[संपादन]

हेही पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]