Jump to content

दीपक सखाराम कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दीपक सखाराम कुलकर्णी
जन्म दीपक
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे डीएसके
नागरिकत्व भारतीय
पेशा बांधकाम व्यावसायिक
धर्म हिंदू
जोडीदार ज्योती
संकेतस्थळ
[१], [२]

दीपक सखाराम कुलकर्णी (दीपक सखाराम कुलकर्णी) हे पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. डी.एस. कुलकर्णी हे डी.एस.के बिल्डर्स म्हणून ओळखले जात असून "घराला घरपण देणारी माणसं" हे डी.एस.केंचं घोषवाक्य आहे. त्यांनी अनेक उद्योगांमध्ये पाय पसरले आहेत आणि त्यांच्या उद्योगांचा वार्षिक टर्न ओव्हर १६०० कोटी रूपयांचा आहे.

बालपण आणि शिक्षण

[संपादन]

डी.एस्.के. यांचा जन्म पुण्यातील कसबा पेठेतला असून आई शाळेत नोकरी करून उरलेल्या वेळात शिकवण्या करणे, कपडे शिवून देणे असे उद्योग करी. पुढे मात्र आईने स्वतःच्या हिंमतीवर एक शाळा काढली. वडील पुण्याच्या हाय एक्स्प्लोझिव फॅक्टरीमध्ये वॉचमन म्हणून काम करीत. पुण्यातल्या तपकीर गल्लीतल्या 'दगडीवाडा' शाळेत सुरुवातीचे शिक्षण झाले. पुढे २री ते ४थी पुणे कॉर्पोरेशनच्या २५ नंबरच्या शाळेत तर ५वीला मंडईतील टिळक पुतळयापाशी असलेल्या कार्पोरेशनच्या १ नंबरच्या शाळेत आणि ६ वी ते मॅट्रिक भारत हायस्कूलमधे त्यांचे शिक्षण झाले. पुढे कॉमर्स शाखेची पदवी घेतली. शाळा सुटली की आसपासचे मित्र वडिलांच्या धंद्याला हातभार लावीत. ते पाहून डी. एस. के. सुद्धा कुठे चण्यामण्या बोरे विकण्याच्या गाडीवर काम कर, कुठे पोत्यावर बसून कै्या वीक, भाजी वीक असले उद्योग वयाच्या सातव्या वर्षापासूनच करू लागले. तिथेच त्यांना कोणतीही वस्तू विकण्याची गोडी निर्माण झाली. मुख्यत: काही काम केले की पैसे मिळतात हे फारच लहानपणी कळले. नंतर पुढे त्यांनी पेपर टाकणे, दिवाळीत फटाके विकणे, काकांच्या भाजीच्या गाडीवर भाजी विकणे असे व्यवसाय केले. यातून एखादी विशिष्ट वस्तू विकताना ती विकण्याची विशिष्ट पद्धत असते हे ते शिकले.

व्यवसाय

[संपादन]

कॉलेजमधील शिक्षण चालू असताना त्यांना उन्हाळयाच्या सुट्टीत किर्लोस्कर ऑईल एंजिन्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी टेलिफोन ऑपरेटर बोर्ड कसा चालवतात हे शिकून घेण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली. हेडफोन लावून बोलण्याच्यावेळी स्पीकरमधून वास आला तो डेटॉलचा. ही आरोग्यदृष्टया घेतलेली काळजी असली तरी डेटॉलच्याऐवजी जर एखादा सेंटचा वापर करण्यासाठी 'टेलिस्मेल' नावाची कंपनी त्यांनी काढली. टेलिस्मेलचे ऑफिस त्यावेळच्या पुणे शहरातील अलका टॉकीज जवळील प्रसिद्ध इमारत 'रवि बिल्डिंग' येथे असावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. सुरुवातीला ओळखीच्याच एका व्यावसायिकाच्या 'रवि बिल्डिंग'मधील ऑफिसात टेबलस्पेस घेण्याची कल्पना डीएसकेंनी मांडली. तेव्हां त्या व्यावसायिकाने ते ऑफिस रंगवून व पार्टिशन लॅमिनेट करण्याची अट घातली. सर्व सामग्री व माणसे उधारीवर घेऊन त्यांनी रंगकाम पूर्ण केले आणि त्यात खूपच फायदा सुटतो हे त्यांच्या लक्षात आले.

रंगाची कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा डीएसकेंचा धंदा उदयास आला. घरे, ऑफिसेस, मोठमोठ्या औद्योगिक इमारतींना रंग देण्याचे काम करीत असताना काही अडचणी येत. त्याच बरोबर फर्निचरचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली. गळकी छपरे दुरुस्त करणे, वेड्यावाकड्या लागलेल्या फरशा नीट करून देणे, जुने वायरिंग बदलून नवीन करून देणे, स्वयंपाक घरातील ओटे बांधून देणे , वॉटरप्रूफिंग करून देणे भिंतींना ओल कशाने येते व कशी जाईल यासंबंधी काहीतरी मार्ग काढणे, अशी अनेक संलग्न छोटीमोठी कामे त्यांनी करून द्यायला सुरुवात केली.

घरे बांधायला यातूनच पुढे सुरुवात झाली व डी.एस.कुलकर्णी आणि कंपनी या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना झाली. याच बरोबर टोयोटाची एजन्सी, जनरल मोटर्सची एजन्सी, ॲरोमा केमिकल्स, हॉटेल व्यवसाय आणि आजकालच्या परवलीच्या धंद्यात - अर्थात सॉफ्टवेर डेव्हलपमेंट अशा अनेकविध उद्योगांत त्यांनी स्वतःचा पाय रोवला.

डी.एस. कुलकर्णींनी सामाजिक आणि शैक्षणिक गरजांसाठी डी.एस.के फाऊंडेशनची निर्मिती केली.. त्यांच्या डी.एस.के. फाउंडेशनतर्फे ते 'डी.एस.के. गप्पा' किंवा मान्यवरांची भाषणे यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम राबवीत असतात. ते स्वतः चांगले लेखक असून त्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती ते स्वतः लिहितात. ते उत्तम व्याख्याते आहेत. रेडिओवर आणि अन्यत्र त्यांची भाषणे होत असतात.

डी .एस. कुलकर्णी यांच्या दिवंगत पत्‍नीच्या नावाचे ज्योती फाऊंडेशन आहे. त्यांच्या जन्मदिनी-ज्योती सन्मान दिनी हे फाउंडेशन गुणवान स्त्रियांना पुरस्कार देते.

कुलकर्णी व त्यांच्या व्यवसायांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे परत न केल्यामुळे २०१७मध्ये त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

२०१५ साली दिले गेलेले पुरस्कार आणि त्यांचे मानकरी

[संपादन]
  • ज्योती उद्योगिनी पुरस्कार : आदर्श महिला बचत गट, सायली मुतालिक, सुहासिनी वैद्य आणि स्वाती ओतारी यांना
  • ज्योती कृषिकन्या पुरस्कार : नंदा काळभोर यांना
  • ज्योती वसुंधरा पुरस्कार : पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अपर्णा वाटवे यांना

डी. एस. कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  1. हिंद रतन स्वोर्ड ऑफ ऑनर ॲवॉर्ड
  2. वसंत वैद्य पुरस्कार

पुस्तक

[संपादन]

प्रा. श्याम भुर्के यांनी डी.एस. कुलकर्णी यांचे ’शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके’ नावाचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती ७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाली.

बाह्य दुवे

[संपादन]