दिल्मा रूसेफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्मा रूसेफ
Dilma Rousseff
दिल्मा रूसेफ

ब्राझील ध्वज ब्राझील देशाच्या ३६व्या राष्ट्राध्यक्षा
विद्यमान
पदग्रहण
जानेवारी १ इ.स. २०११
मागील लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा

अध्यक्षीय स्टाफ प्रमुख
कार्यकाळ
२१ जून २००५ – ३१ मार्च २०१०
राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा

खाण व उर्जा मंत्री
कार्यकाळ
१ जानेवारी इ.स. २००३ – २१ जून इ.स. २००५
राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा

जन्म १४ डिसेंबर, १९४७ (1947-12-14) (वय: ६८)
बेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस, ब्राझील
सही दिल्मा रूसेफयांची सही
संकेतस्थळ संकेतस्थळ

दिल्मा व्हाना रूसेफ (पोर्तुगीज: Dilma Vana Rousseff) (जन्म: १४ डिसेंबर १९४७) ह्या ब्राझिल देशाच्या ३६व्या व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. गतराष्ट्राध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ह्याच्या मंत्रीमंडळामध्ये प्रमुख सचिव राहिलेल्या रूसेफ ब्राझीलच्या पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. ऑक्टोबर २०१० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये त्या ५६ टक्के मते मिळवून राष्ट्राध्यक्षपदावर आल्या व ऑक्टोबर २०१४ मधील चुरशीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत कमी मताधिक्याने विजय मिळवून त्यांनी सत्ता राखली.

बल्गेरियामधून स्थलांतर केलेल्या कुटुंबामधून आलेली रूसेफ अर्थतज्ज्ञ असून देशातील इ.स. १९८५ पूर्वीच्या हुकुमशाहीविरोधातील बंडखोरीमध्येही तिने सहभाग घेतला होता. मावळता लोकप्रिय अध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ह्याने रूसेफची राजकीय वारसदार म्हणून निवड करून निवडणुकीमध्ये तिला पाठिंबा दिला होता.

रूसेफ ब्राझीलमध्ये लोकप्रिय असून तिच्या ब्राझीलमधील पायाभुत सुविधा सुधारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक झाले आहे. जर्मनीची चान्सेलर आंगेला मेर्कल व माजी अमेरिकन परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन ह्यांच्या समवेत रूसेफचा जगातील बलाढ्य व लोकप्रिय महिला नेत्यांमध्ये उल्लेख केला जातो.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]