दालन चर्चा:विशेष लेखन
दालन:विशेष लेखन येथे सहयोग हवा
[संपादन]- मराठी विकिपीडिया अधीक वाचकाभिमूख बनवण्याच्या दृष्टीने , इंग्रजी विकिपीडियातील en:Portal:Featured content च्या धर्तीवर दालन:विशेष लेखन येथे भाषांतर आणि इतर लेखन सहयोग हवा आहे.माहितगार ०७:४७, ८ जुलै २०१० (UTC)
सहयोगास तयार. कसे करावे, सांगा. -मनोज १२:०६, १७ जुलै २०११ (UTC)
ok आज रात्री अधीक सविस्तार माहिती देतो मुखपृष्ठावर सर्वच विषयांना स्थान देणे शक्य होत नाही त्यामुळे या दालनामुळे इतर चांगल्या लेखांना न्याय देणेही सोपे जाईल आणि वाचंकांनाही वाचनीय लेख अधिक निवडण्याचा मार्ग अधिक सुलभही होतो.
मुख्पृष्ठावरील मुखपृष्ठ सदराचे पान कसे बनवले जाते तसेच दालनांच्या इतर एखादे दालन खास करून अविशिष्ट मजकुर आपोआप कसा निवडला जातो .किंवा सेंट्रल नोटिस मध्ये सुचना आपोआप एका नंतर एक कशा येतात ते पाहुन घेणे उपयोगाचे ठरेल. माहितगार १५:५३, १७ जुलै २०११ (UTC)
ब्राँझ तारका
[संपादन]अभयजी, मुळ इंग्रजी लेखनात 'ब्राँझ तारका'(Bronze star) असा उल्लेख होता. 'पितळी तारका' असा आपण त्यात बदल केला आहे. ब्राँझ व पितळ हे धातु वेगवेगळे आहेत असा माझा समज आहे.कृपया खुलासा करावा ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) १०:०३, ९ जुलै २०१० (UTC)
सहमत. ब्रॉंझ हे विशेष नाम आहे. त्याला चपखल मराठी प्रतिशब्द नसेल तर ते तसेच वापरणे योग्य.-मनोज १२:०६, १७ जुलै २०११ (UTC)
- ब्रॉंझ मेडल ला कास्य पदक म्हणतात तर ब्रॉंझ तारकेला = ? राहुल देशमुख १३:०२, १७ जुलै २०११ (UTC)
- मी हा बदल केलेला आठवत नाही आणि तो इतिहासात दिसतही नाही. ब्राँझसाठी मराठी प्रतिशब्द कांस्य आहे. मेडल = पदक. तारका = चांदणी.
- अभय नातू १६:२२, १७ जुलै २०११ (UTC)
स्वयंभू गुरुदत्त तिर्थक्षेत्र वारळ- रायगड
[संपादन]९ फेब्रुवारी १९७२ रोजी गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या उतान कडा ओढ्यातील झर्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या वारळ गावातील १०/१२ वर्षाच्या ४ अजाण मुलांना त्या नदी पात्रात अचानक एक तेजोमय वलय नजरेस आला,त्या वलयातून प्रत्यक्ष सगुण रुपात श्री दत्तगुरु नी दर्शन दिले. ते तेजोमय रूप सहन न झाल्यामुळे भेदरलेली मुले गावाकडे पाळली,हे अद्भुत कथन ऐकून गावातील ज्येष्ठ मंडळी ओढ्याकडे पोहचली असता त्यांना ओढ्यात खडकाळ जागी एका गुहेचे निर्माण होवून श्री दत्तगुरु त्या गुहेमध्ये स्थानापन्न झालेले नजरेस पडले. ही माहिती अगदी काहीच वेळात वाऱ्याच्या वेगाने पंचक्रोशीतील हजारो भक्तांच्या कानी पडताच अखंड महाराष्ट्रातून भक्तांची अपार गर्दी दर्शनास लोटली,भक्तांची वर्दळ पाहून स्वयंभू गुरुदत्त मंडळ यांनी गैरसोय होवू नये म्हणून तूर्तास पायवाटेच्या जागी रस्त्याचे निर्माण केले,तदनंतर तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.अंतुले साहेबांनी स्वयंभू स्थानांची महिती ऐकून व भाविकांची गर्दी पाहून डांबरी रस्त्याचे आणि विजेची सोय करून दिली.
स्वयंभू स्थानाची महती व येणार्या भाविकांच्या सोयीसाठी स्वयंभू गुरुदत्त मंडळ ट्रस्ट ने या जागी मंदिर निर्मितीचे स्वप्न पाहिले,ह्या कमी अनेक स्तरातून येणाऱ्या मदतीचा ओघ,आणि सन्माननीय खासदार श्री. सुनिलजी तटकरे यांच्या सहकार्याने मंदिर निर्माण कार्याची पायाभरणी करण्यात आली.
श्री दत्तगुरु कृपेने मंदिराचे निर्माण कार्य अविरत चालू आहे,भाविकांना नम्रतेची आवाहन आहे की या सत्कर्यात सहभागी होऊन ,श्री गुरुदत्त चरणी आपली सेवा रुजू व्हावी,हीच नम्रतेची विनंती.. अधिक माहितीसाठी www.swayambhugurudattatirthkshetrawaral.com
स्वयंभू मंदिर निर्माण समिती - वारळ 103.58.153.82 १९:०८, ५ जानेवारी २०२२ (IST)