दालन:बौद्ध धर्म/मुख्यलेख
Appearance
बौद्ध धर्म भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. या धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या निर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. जगात बौद्ध धर्माचे १५० ते २०० कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.