दामोदर दिनकर कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दामोदर दिनकर मधुकाका कुलकर्णी (ऑक्टोबर २३, इ.स. १९२३ - फेब्रुवारी २२ इ.स. २०००) हे मुंबई येथे ३ जून १९९० रोजी झालेल्या सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.

मधुकाका नावाने परिचित असणारे श्री.दामोदर दिनकर कुलकर्णी हे एक धडाडीचे व आक्रमक प्रकाशक होते. १९४७ ते १९६२ या काळात कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे येथे तसेच १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी संयुक्त साहित्य या संस्थांमध्ये काम केले. १९६८ मध्ये त्यांनी श्रीविद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. 'वाळवंटातील चंद्रकोर' हे त्यांचे पहिले प्रकाशन. त्यानंतर ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. पैकी 'आंबेडकरी चळवळ', 'अक्करमाशी', 'उचल्या', 'काबूलनामा', 'श्री विठ्ठल एक महासमन्वय',' मेड इन इंडिया', 'लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक' आदी महत्त्वाची पुस्तके आहेत.

श्रीविद्या प्रकाशनाच्या 'उचल्या' या लक्ष्मण गायकवाड लिखित पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार.

मधुकाका कुलकर्णी यांनी 'प्रकाशकनामा' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने प्रभात रोड गल्ली क्रमांक १४ मधील आयकरभवनच्या चौकाला ४-२-२०१८ रोजी मधुकाका कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले.