बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बा.द. सातोस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (ऊर्फ बा.द. सातोस्कर) (जन्म : मार्च २६, इ.स. १९०९ - - नोव्हेंबर २७, २०००) हे मराठी पत्रकार, संपादक होते. 'दैनिक गोमंतक' या दैनिकाचे ते पहिली पाच वर्षे संपादक होते.

बा. द. सातोस्कर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी, म्हणजे २६-३-२००९ला डॉ. भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथाचे संपादक प्रा. रवींद्र घवी आहेत.

बा.द. सातोस्करांची ग्रंथसंपदा (कंसात प्रकाशक आणि पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन वर्ष)[संपादन]

 • अनुपा (सागर साहित्य-१९७९)
 • अभिराम (शुभदा सारस्वत १९८९)
 • अभुक्ता(सागर साहित्य-१९७८)
 • अर्वाचीन गोव्याचा इतिहास खंड १ ते ३ (१९८७)
 • आई (शुभदा सारस्वत १९५९)
 • ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास
 • गोमंतक प्रकृती आणि संस्कृती खंड १ (शुभदा सारस्वत-१९७९)
 • गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार (सागर साहित्य-१९७५)
 • ग्रंथ वर्गीकरण तात्त्विक (१९६०)
 • जाई (शुभदा सारस्वत १९६२)
 • दिग्या (१९६२)
 • द्राक्षांच्या देशात (सागर एन्टरप्रायझेस १९४४)
 • द्विबिंदु वर्गीकरण पद्धती आणि तिचा मराठी ग्रंथालयात उपयोग (१९५८)
 • पारिसचे भविष्य/युलिसिसचा प्रवास (१९४६)
 • प्रीतीची रीत व इतर कथा (१९६१)
 • बादसायन (शुभदा सारस्वत १९९३)
 • मराठी मासिकांचे पहिले शतक (शुभदा सारस्वत १९८६)
 • मेनका (सागर साहित्य-१९७८)
 • येथे देवांची वसती ((सागर साहित्य-१९८२)
 • रक्तहीन क्रांती (महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर-१९४६)
 • रामायण काळातील जमाती व संस्कृती
 • वासुदेव (शुभदा सारस्वत १९९०)
 • शांग्रीला (सागर साहित्य-१९८२)

बा.द. सातोस्कर लेखातील मजकुर विलिनीकरणासाठी स्थानांतरीत[संपादन]

बा.द. सातोस्कर तथा बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (२६ मार्च, इ.स. १९०९ - २७ नोव्हेंबर, इ.स. २०००)
हे म्हापसे,गोवा येथे २२ एप्रिल १९८९ रोजी झालेल्या पाचव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.

लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी, पोर्तुगीज, कोकणीहिंदी भाषा या भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून आणि त्या भाषांत त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. गाव तिथे ग्रंथालय या चळवळीचे बा.द.सातोस्कर जनक होते.. गोमंतक दैनिकाचे ते पहिली पाच वर्षे संपादक होते व सागर प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था होती.

लेखन - गोमंतक प्रकृती व संस्कृती तीन खंड, गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार, 'बादसायन' हे त्यांचे आत्मचरित्र. रामायण काळातील जमाती व संस्कृती, अभिराम, वासुदेव, ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास, पारिसचे भविष्य इत्यादी.