दत्तू फडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्तात्रेय गजानन तथा दत्तू फडकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९२५ रोजी कोल्हापूर येथे झाला. मुंबईच्या रॉबर्ट मनी हाय स्कुल मध्ये फडकर यांचे शालेय शिक्षण झाले तर त्यांनी बी. ए.ची पदवी एल्फिंस्टन महाविद्यालयातून घेतली.

दत्तू फडकर
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यमगती, ऑफब्रेक
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी ३२.२४ -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके २/८ -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या १२३ -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी ६२ -- {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी ३६.८५ -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी ७/२५९ -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत २१/० -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

जुलै ६, इ.स. २००६
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)


फडकर उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज, उजव्या हाताने जलद मध्यमगतीने आणि चेडू दोन्ही बाजुने वळवू शकणारे गोलंदाज आणि प्रामुख्याने स्लीप मध्ये उभे राहून क्षेत्र रक्षण करणारे असे बहु आयामी खेळाडू होते.

वयाच्या १० व्या वर्षी आंतर शालेय सामन्यात फडकर यांनी १५६ धावा काढल्या. तर आपल्या महाविद्यालयीन सामन्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी २७४ धावा फटकाविल्या. मुंबई विद्यापीठाकडून ते १९४१-४२ आणि १९४६-४७ च्या मोसमात खेळले. वयाच्या १७ व्या वर्षी दत्तू फडकर मुंबई संघाकडून प्रथम वर्गीय क्रिकेट खेळावयास लागले. १९४८-४९ च्या मोसमात महाराष्ट्र विरुद्ध खेळतांना फडकर यांनी आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीची झलक दाखविली. त्यांनी अनुक्रमे १३१ आणि १६० धावा काढल्या तर दोन्ही वेळा ३-३ खेळाडू बाद केले. फडकर यांनी १९५०-५१ च्या मोसमात महाराष्ट्र विरुद्ध काढलेल्या २१७ धावा हा त्यांचा वैयक्तिक उच्चांक होता.

१९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फडकर यांची निवड भारताच्या राष्ट्रीय संघात करण्यात आली. यातील पदार्पणाच्या सिडनी येथील कसोटी सामन्यात फडकर यांना आठव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी संघास गरज असतांना ५१ धावा काढल्या आणि गोलंदाजीत १४ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. पुढील ऍडलेड येथील सामन्यात फडकर यांना साहव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. तेव्हा विजय हजारेसह खेळतांना १२३ धावा काढत १८८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. या मोसमात खेळल्या गेलेल्या चारही सामन्यात दत्तू फडकर यांनी किमान ५० धावा तरी काढल्या आणि लिंडवॉल सारख्या गोलंदाजाचा समाचार घेतला.

याच्या पुढील वर्षी चेन्नई येथे वेस्ट इंडीज विरुद्ध खेळतांना फडकर यांनी १५९ धावांच्या मोबदल्यात ७ गडी बाद करत आपला गोलंदाजीचा विक्रम नोंदविला. हा सामना भारताने केवळ सहा धावांनी गमाविला, फडकर ३७ धावांवर नाबाद राहिले.

१९५२ साली इंग्लंड विरुद्ध खेळतांना भारताची परिस्थिती वाईट होती, ० धावांवर ४ गडी बाद झाले होते. त्यावेळी फडकर-ह्जारे जोडीने १०५ धावांची भागीदारी करत भाराताची बाजु सांभाळण्याचा प्रयत्न केला.

कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती पत्करल्यानंतर फडकर यांनी कोलकाता येथे एक शाळा काढली. त्यांनी काही काळ टाटा सन्स आणि भारतीय रेल्वे मध्ये नोकरीही केली. १९७० साली भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यांना खेळाडूंचे निवड कर्ता म्हणून नेमले होते.

दि. १७ मार्च १९८५ रोजी मेंदुच्या विकाराने दत्तू फडकर यांचे चेन्नई येथे निधन झाले.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.