तेजस्विनी सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेजस्विनी सावंत
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव तेजस्विनी सावंत
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान कोल्हापुर, महाराष्ट्र, भारत
जन्मदिनांक १२ सप्टेंबर, १९८० (1980-09-12) (वय: ३५)
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी

तेजस्विनी सावंत (१२ सप्टेंबर, इ.स. १९८०)[१] ही महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातली एक जागतिक विजेतेपद मिळवणारी भारतीय महिला नेमबाज आहे. तिचे वडील भारताच्या नौदलात अधिकारी होते.

कारकीर्द[संपादन]

इस्लामाबाद मध्ये २००४ मधील नवव्या दक्षिण आशिया क्रिडा महासंघ खेळांत तेजस्विनीने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात वाटा उचलला. त्यानंतर राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेती अंजली वेदपाठक भागवत आणि जागतिक विक्रमाची नोंद असलेली सुमा शिरूर यांना मागे टाकत तिने पाच सुवर्णपदके, सहा रजतपदके आणि पाच कांस्यपदकांची कमाइ केली. २००६ च्या मेलबोर्न राष्ट्रकुल खेळांत महिलांच्या १० मीटर एर रायफल सिगंल्स आणि महिलांच्या १० मीटर एर रायफल दुहेरी प्रकारात अवनीत कौर सिद्धूसोबत तिने सुवर्णपदकांची कमाइ केली. म्युनिख (जर्मनी) इथल्या २००९ च्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत ५० मीटर रायफलथ्री पोझिशन्स प्रकारात तेजस्विनीने कांस्यपदक पटकावले. म्युनिखमध्ये ५० मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तेजस्विनी सावंतने ८ ऑगस्ट २०१० रोजी जागतिक विजेतेपद प्राप्त केले. ५० मीटर रायफलप्रोन प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करीत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. ऑलंम्पिक आणि विश्वचषक स्पधेर्त पदक मिळवणे हे तेजस्विनीचे स्वप्न आहे. सध्या भारतीय ज्युनिअर नेमबाजी संघात तेजस्विनीचा समावेश झाला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  1. तेजस्विनी सावंत प्रोफाईल, मेलबोर्न राष्ट्रकुल खेळांचे संकेतस्थळ.