तुलसी कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुलसी कुमार

तुलसी कुमार
पारिवारिक माहिती
वडील गुलशन कुमार
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ २००६-चालू

तुलसी कुमार ही एक भारतीय गायिका आहे. २००६ सालच्या चुपचुप के ह्या बॉलिवूड चित्रपटासाठी पार्श्वगायन करून तिने संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी म्हटली आहेत. २०१३ सालच्या आशिकी २ चित्रपटांमधील तिने गायलेली गाणी गाजली. २००९ साली तुलसीने लव्ह हो जाये नावाचा जो आल्बम प्रकाशित केला तोदेखील यशस्वी झाला.

तुलसी कुमार ही टी-सीरीज या संगीताच्या ध्वनिफिती बनवणाऱ्या कंपनीचे मालक भूषण कुमार यांची बहीण आहे.

बाह्य दुवे[संपादन]