तिरुवल्लुवर पुतळा
Jump to navigation
Jump to search

कन्याकुमारी येथील तिरुवल्लुवर पुतळा
तिरुवल्लुवर पुतळा व जवळील विवेकानंद स्मारक
तिरुवल्लुवर पुतळा हा प्रसिद्ध तमिळ कवी तिरुवल्लुवर ह्याचा एक मोठा पुतळा आहे. १३३ फूट (४०.६ मी) उंचीचा हा पुतळा तमिळनाडूच्या कन्याकुमारी गावाजवळ हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावर बांधण्यात आला आहे. १ जानेवारी २००० रोजी ह्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
१९७९ साली तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई ह्यांच्या हस्ते ह्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ पार पडला. परंतु प्रत्यक्ष बांधकाम १९९० साली सुरू झाले. १९९९ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले.
९५ फूट उंचीचा हा दगडी पुतळा कवी तिरुवल्लुवरांना उभ्या स्थितीत दर्शवतो. पुतळ्याच्या कंबरेपाशी देण्यात आलेले हलकेसे वळण नटराजाची नृत्यस्थिती रंगवतो.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत