तळेगाव (चाळीसगाव)
Appearance
स्थान
[संपादन]तळेगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावर वसलेले आहे. चाळीसगाव येथे रेल्वे स्थानक आहे.
लोकजीवन
[संपादन]गावात प्रामुख्याने हिंदू धर्मीय आहेत. गावातील ५० टक्के लोकसंख्या ही मराठा जातीची आहे.
प्रशासन
[संपादन]इथला कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो. हे गाव चाळीसगाव पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते. तलाठी कार्यालय चाळीसगाव येथे आहे.
शिक्षण
[संपादन]गावात प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.
आरोग्य
[संपादन]गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच खाजगी इस्पितळही आहे.
व्यवसाय
[संपादन]येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. काही लोक इतर व्यवसाय करतात. येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक व आय डी बी आय, या बँका आहेत.