डॅन ब्राऊन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियल ब्राऊन
जन्म नाव डॅनियल ब्राऊन
टोपणनाव डॅन ब्राऊन
जन्म जून २२, इ.स. १९६४
एक्सेटर, न्यू हॅम्पशायर अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र लेखन
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकार रोमांचक काल्पनिक
प्रसिद्ध साहित्यकृती द दा विंची कोड
स्वाक्षरी डॅन ब्राऊन ह्यांची स्वाक्षरी
संकेतस्थळ http://www.danbrown.com

डॅन ब्राऊन ( जून २२, इ.स. १९६४ - हयात) हा प्रसिद्ध अमेरिकन लेखक आहे. त्यांनी अमेरिकेतील ‘ॲमहर्स्ट कॉलेज ॲन्ड एक्झिटर ॲकॅडमी’मधून पदवी संपादन केली आणि त्याचे कॉलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले. डॅन ब्राऊन यांचे इ.स. २००३ साली "द दा विंची कोड" हे वादातीत पुस्तक प्रकाशित झाले. डॅन ब्राऊन यांच्या सध्याच्या कादंबऱ्यांमध्ये रॉबर्ट लॅंगडन हे मध्यवर्ती पात्र असते. कादंबरीचे कथानक कोडी, षड्यंत्रे, चिन्हे, गुपिते याच्यावर आधारित असते. या कहाण्यांमध्ये कोड्याचा / गुपितांचा उलगडा साधारणतः २४ तासाच्या आत होतो. त्यांच्या कादंबऱ्यांचे ५२ विविध भाषांत अनुवाद झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या २० कोटी पेक्षा जास्ती प्रती विकल्या गेल्या आहेत. मराठीतील बहुतेक अनुवादित पुस्तके पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहेत.

‘टाईम मॅगेझीन’ने जगातील शंभर प्रभावी व्यक्तींपैकी एक असा डॅन ब्राऊन यांचा उल्लेख केला आहे.[१].

प्रकाशित पुस्तके[संपादन]

रॉबर्ट लॅंगडन कथानके[संपादन]

  1. एन्जल्स ॲन्ड डेमन्स (२०००); मराठी अनुवाद - बाळ भागवत
  2. द दा विंची कोड (२००३); मराठी अनुवाद - अजित ठाकूर
  3. द लॉस्ट सिम्बॉल (२००९); मराठी अनुवाद - अशोक पाध्ये
  4. इन्फर्नो (२०१३)

इतर कथानके[संपादन]

  1. डिजिटल फॉर्टेस (१९९८); मराठी अनुवाद - अशोक पाध्ये
  2. डिसेप्शन पॉईंट (२००१); मराठी अनुवाद - अशोक पाध्ये

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]