डिसेप्शन पॉईंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डिसेप्शन पॉईंट
लेखक डॅन ब्राऊन
अनुवादक अशोक पाध्ये
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती ऑक्टोबर, २००९
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठसंख्या ६००
आय.एस.बी.एन. ९७८-८१-८४९८-०७९-०

कथानक[संपादन]

आर्क्टिक्टच्या बर्फमय भूमीत एक उल्का नासाला सापडली.
विज्ञानातील त्या घटनेने नासाला संजीवनी मिळाली.

अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या
रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली
एक स्फोटक मालिका.

त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या.
एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची.

३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा
मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली,
विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले.

तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली.
सत्य उघडकीस आले तर?
ते उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्‍न.

अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून निघालेली अमेरिका.