Jump to content

डाईमलर आ.गे.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डायमलर या पानावरून पुनर्निर्देशित)

डायमलर ही एक कार बनविणारी कंपनी असून जगातली १३ वी सर्वात मोठी कार ऊत्पादक कंपनी आहे. आर्थिक उत्पादकतेच्या दृष्टीने ती जर्मनीमधील काही सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी आहे. प्रवासी चारचाकी वाहनांप्रमाणेच डायमलर मालवाहतूकीसाठी लागणारे मोठे ट्रकही बनवते. त्याचप्रमाणे 'डायमलर फायनान्शियल सर्व्हीसेस'तर्फे डायमलर वित्तपुरवठा व्यवसायतही कार्यरत आहे. युरोपातील हवाई वाहतूक कंपनी 'इ.ए.डी.स.', अभियांत्रिकी सेवा देणारी 'मॅक्लारेन', जपानमधील ट्रक आणि बस बनविणारी 'मित्सुबिशि फुसो' आणि अमेरीकास्थित 'ख्रायस्लर' या वाहन उत्पादक कंपनी मधे डायमलर प्रमुख भागीदार आहे.

डायमलर मर्सिडीज बेंझ, 'मायबाख' या आलिशान चारचाकी गाड्या बनविते. त्याचप्रमाणे 'स्मार्ट' या नावाने छोट्या गाड्या आणि 'फ्राईटलाईनर' या नावाने अतिजड ट्रक बनविते.

या कंपनीचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे.

इतिहास

[संपादन]

डाईमलर बेंझ ही कंपनी १८८३ मध्ये स्थापन झाली. नंतर 'ऱ्हाईनीश गॅस ईजिन फॅक्टरी'च्या एकत्रीकरणानंतर 'डाईमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट' ही कंपनी अस्तित्वात आली.

डायमलर बेंझ (१९२६-१९९८)

[संपादन]

१९२० च्या दशकात जगातल्या बऱ्याच वाहनउत्पादक कंपन्यांची आर्थिक परीस्थिती डबघाईला आली होती. त्यावेळेस डायमलर आणि बेंझ या कंपन्यांची परीस्थितीही फारशी खास नव्हती. त्यावेळेस 'द्यॉईच बँकेच्या' सल्ल्यानुसार बर्लिनमध्ये 'डायमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट' आणि 'बेंझ अँड को' यांच्या एकत्रीकरणातून (२६ जून १९२८) 'डायमलर बेंझ' ही नवी कंपनी अस्तित्वात आली. तेव्हापासून 'द्यॉईच बँकेचा' कंपनीच्या कारभारामध्ये महत्त्वाचा वाटा राहीला आहे.

दुसऱ्या महायुद्धात कंपनी 'नाझी जर्मनी'करिता लष्करी साहीत्य बनवत असे. प्रामुख्याने लष्करी वाहने बनविण्याचे काम केले जाई. त्याकाळी पुष्कळ कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जाई. त्याकाळी प्रत्येकी ३ कामगारांपैकी एक युद्धकैदी असे.

दुसऱ्या महायुद्धात कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले. ५ सप्टेंबर १९४४ रोजी कंपनीचा 'उंटरटुर्कहाइम' इथला प्रमुख कारखाना दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेस्तनाबूत केला होता.

परंतु युद्धानंतरच्या काही वर्षांमध्ये विविध कल्पक नेतृत्वामुळे कंपनीने जोरदार पुनरागमन केले. कंपनीने १९५१ प्रवासी सुरक्षततेसाठी नवा विभाग स्थापन केला. १९८१ मध्ये धडक झाल्यावर सुरक्षित ठेवणाऱ्या पिशव्या आणि प्रवाशांसाठी पट्टे अशा नवनवीन संकल्पना बाजारात आणल्या. कंपनीचा वाढीचा आलेख त्यानंतर वर वर जात राहीला. १९६२ मध्ये कंपनीने ९०,००० तर १९७२ मध्ये १,४९,८०० लोकांना रोजगार दिला.

१९८० च्या दशकात कंपनीने डोरनिएर, एम.टी.यु., फोक्कर, एईजी या कंपन्या विकत घेतल्या. हवाईवाहतुकीत प्रवेश करत कंपनीने 'द्यॉईच एयरबस' नावाची कंपनी सुरू केली.

डायमलर क्राइस्लर आ. गे. (१९९८-२००७)

[संपादन]

१२ जानेवारी १९९८ मध्ये अमेरीकेतल्या डेट्रॉईट या गावी डायमलर आणि ख्राईस्लर या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणातून 'डायमलर-ख्राईस्लर' ही नवी कंपनी अस्तित्वात आली. या एकत्रीकरणाला 'युरोपियन महसंघाने' (मे १९९८) आणि अमेरीकेतल्या संबधित अधिकाऱ्यांनी (जुलै १९९८) मध्ये मान्यता दिली. एकत्रीकरणाच्या वेळी दिल्या गेलेल्या समसमान भागीदारीच्या भावनेतून कंपनीच्या प्रमुख बैठका श्टुटगार्ट (जर्मनी) आणि 'ऑबर्न हील्स' (अमेरीका) येथे आलटूनपालटून घेण्यात येत असत.

१ जानेवारी २००६ला डीटर झेट्श या नव्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्याच्या काळात कंपनीवरील जर्मन भागीदारांचा प्रभाव वाढत गेला. त्यानंतर काही काळातच कंपनीतून ६००० पदे कमी करण्यात आली. डायमलर-ख्राईस्लरच्या एकत्रीकरणावर पहील्यापासूनच टीका करण्यात आली होती. नंतरच्या काही काळामध्ये प्रमुख कार्यकाऱ्यांच्या संशयास्पद ऊचलबांगडीनंतर याविषयीची चर्चा अधिकच जोर पकडू लागली. दरम्यान 'ख्राईस्लर' या कंपनीची बाजरातील पत घसरू लागली आणि अखेर २००७ च्या वार्षिक बैठकीमध्ये 'ख्राईस्लर'च्या विक्रीविषयी घोषणा करण्यात आली.

पुढे 'ख्राईस्लर' कंपनी 'सेरेब्रस' कंपनीने विकत (८०.१%) घेतली आणि 'डायमलर' कडे काही हीस्सा (१९.९%) ठेवण्यात आला.

डायमलर आ.गे. (२००७ पासून पुढे)

[संपादन]

ऑक्टोबर २००७ च्या विषेश बैठकीनंतर कंपनीने 'डाईमलर आ.गे.' हे नाव धारण केले आणि डीटर झेट्श यांची प्रमुख कार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली.

प्रमुख भागदारक

[संपादन]

१. ३६.७ % जर्मनी.

२. ३६.२ % युरोप (जर्मनी सोडून)

३. १९.८ % अमेरिकेची संयुक्त संस्थाने

४. ७.३ % ऊर्वरीत देश

प्रमुख उत्पादने

[संपादन]

१. मर्सिडीज बेंझ

अ. मर्सिडीज बेंझ.

ब. मायबाख.

क. स्मार्ट.

ड. मर्सिडीज ए.एम.जी.

२. डायमलर ट्रक्स

अ. मर्सिडीज बेंझ ट्रक्स.

ब. फ्राईटलाईनर.

क. मित्सुबिशि फुसो.

ड. थॉमस बस.

इ. स्टर्लिंग ट्रक्स.

३. बस.

अ. मर्सिडीज बेंझ बस.

ब. ओरियन बस.

क. सेट्रा.

४. मर्सिडीज बेंझ व्हॅन्स.

५. डायमलर वित्त विभाग.

इतर कंपन्यांमधील भागिदारी

[संपादन]

१. ८५% मित्सुबिशी ट्रक आणि बस, जपान.

२. ५०.१% ऑटोमोटीव फ्युएल सेल, कॅनडा.

३. ४०% मॅक्लारेन, युनायटेड किंग्डम.

४. २२.४% युरोपियन एरोनॉटिक्स डीफेन्स अँड स्पेस कं. (एरबस या विमान उत्पादक कंपनीच्या भागदारकांपैकी)

५. २२.३% टॉग्नम, जर्मनी.

६. १९.९% क्राइस्लर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने.

७. ७% टाटा मोटर्स, भारत.

बाह्य दुवे

[संपादन]
  • [www.daimler.com अधिकृत संकेतस्थळ]