टोमोयुकी यामाशिता
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
Tomoyuki Yamashita टोमोयुकी यामाशिता- (८ नोव्हेंबर १८८५ ते २३ फेब्रुवारी १९४६) हे दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्यातील जनरल होते व युद्ध संपल्यावर युद्धातील गुन्ह्यांबद्दल त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.
Tomoyuki Yamashita | |
---|---|
山下 奉文 | |
Military Governor of Japan to the Philippines | |
कार्यालयात 26 September 1944 – 2 September 1945 | |
Monarch | Emperor Shōwa |
मागील | Shigenori Kuroda |
पुढील | Position abolished |
वैयक्तिक माहिती | |
जन्म |
८ नोव्हेंबर १८८५ Ōtoyo, Kōchi, Empire of Japan |
मृत्यू |
२३ फेब्रुवारी, १९४६ (वय ६०) Los Baños, Laguna, Commonwealth of the Philippines |
मृत्यूचे कारण | Execution by hanging |
चिरविश्रांतीस्थान | Tama Reien Cemetery, Fuchū, Tokyo, Japan |
शिक्षणसंस्था | Imperial Japanese Army Academy |
Order of the Golden Kite Order of the Rising Sun Order of the Sacred Treasure Order of the German Eagle | |
Military service | |
टोपणनावे |
Tiger of Malaya The Beast of Bataan[१] |
Allegiance | साचा:देश माहिती Empire of Japan |
Service/branch | साचा:Army |
Years of service | 1905–1945 |
लष्करी पद | General |
Commands |
25th Army 1st Area Army 14th Area Army |
Battles/wars |
World War I Second Sino-Japanese War Pacific War |
जपानी साम्राज्याच्या दक्षिण आशियातील विस्तारामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. १९४२ मध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली, जपानी सैन्याने ब्रिटिश साम्राज्यातील मलेशिया (ब्रिटिश मलया) व सिंगापूर हे केवळ ७० दिवसांमध्ये, युद्धात जिंकून घेतले. इतिहासात 'मलेशियाची चढाई'[१] व 'सिंगापूरचा पाडाव'[२] या नावाने या लढाया ओळखल्या जातात. या पराक्रमामुळे त्यांना ‘मलेशियाचा वाघ’ म्हणून ओळखले गेले; तर सिंगापूरचा पाडाव हा ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात नामुष्कीचा व साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारा ठरला.
पुढे यामाशिता यांची नेमणूक फिलिपाईन्स मध्ये मित्र राष्ट्रांची चढाई रोखण्यासाठी झाली. इथे त्यांना यश मिळाले नाही, परंतु युद्ध संपेपर्यंत (ऑगस्ट १९४५) लुझॉन [३] चा काही भाग जपानच्या अधिपत्याखाली ठेवण्यात त्यांना यश आले.
युद्धात जपानचा पाडाव झाल्यावर युद्धकैदी म्हणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने केलेल्या अत्याचारांना जाणून बुजून न रोखल्याबद्दल, त्यांना १९४६ मध्ये मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली. अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय कायद्या मध्ये-, हाताखालील सैनिकांनी केलेल्या अत्याचारासाठी, अधिकाऱ्याला जबाबदार ठरविणे व सैनिकांना न थांबविल्याबद्दल शिक्षा करणे-, याला 'यामाशिता स्टँडर्ड'[४] असे म्हणतात.
कारकीर्द
[संपादन]यामाशिता यांचा जन्म जपान मधील ओसुगी नावाच्या गावात झाला. आज हे गाव शिकोकू [५] बेटावरील, कोची प्रीफेक्चर [६] मधील ऑटोयो [७] शहराचा भाग झालेला आहे. त्यांचे वडील ओसुगी हे एक डॉक्टर होते व टोमोयुकी यामाशिता हा त्यांचा दुसरा मुलगा होता.
'इंपिरीयल जापनीस आर्मी अॅ कॅडमि'च्या [८], १९०५ सालच्या, १८ व्या तुकडीचे ते स्नातक होते. पहिल्या महायुद्धात [९](१९१४ मध्ये), लेफ्टनंट म्हणून त्यांनी चीन मधील शेंडोंग (Shandong, China) [१०] येथे, जर्मन सैन्याबरोबर झालेल्या लढाईत भाग घेतला. १९१६ मध्ये कॅप्टन म्हणून त्यांना बढती मिळाली. त्याच वर्षी त्यांचे लग्न, निवृत्त जनरल नागायामा यांची मुलगी, हिसाको नागायामा, हिच्याशी झाले. नंतर १९१९ ते १९२२ या कालखंडात, जर्मनीतील बर्न व बर्लिन येथे, सहायक मिलिटरी अटॅशे म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२२ मध्ये त्यांना मेजर या हुद्दयावर बढती मिळाली व ते जपानला परत आले. त्यांची नेमणूक मुख्यालयात व स्टाफ कॉलेज येथे झाली. १९२५ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून त्यांची नेमणूक झाली, व १९२७ ते १९३० या काळात, ऑस्ट्रियातील विएन्ना येथे मिलिटरी अटॅशे म्हणून त्यांनी काम पहिले. १९३० साली कर्नल यामशिता यांची नेमणूक अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'थर्ड इंपिरीयल इन्फंट्रि रेजिमेंट' किंवा 'इंपिरीयल गार्ड डिवीजन'[११] याचे प्रमुख म्हणून झाली. ऑगस्ट १९३४ मध्ये यामशिता यांना मेजर जनरल हा हुद्दा मिळाला.
२६ फेब्रुवारी १९३६ रोजी आर्मीमधील काही लोकांनी बंड केले [१२]. या बंडात सहभागी झालेल्यांना कठोर शिक्षा देऊ नये, अशी भूमिका यामशिता यांनी घेतली, व त्यामुळे सम्राट हिरोहितो यांच्या [१३] मर्जितून ते उतरले. त्यांची नेमणूक कोरियामधील एका ब्रिगेड चे प्रमुख म्हणून केली गेली. नोव्हेंबर १९३७ मध्ये यामशिता लेफ्टनंट जनरल झाले. जपान ने चीनशी चालू असलेले युद्ध संपवावे व अमेरिका आणि ब्रिटन यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या या सल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले व त्यांची नेमणूक, कमी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या, क्वांटांग आर्मी [१४] येथे करण्यात आली.
१९४० मध्ये, ६ महिन्यांसाठी त्यांना एका गुप्त मसलती साठी जर्मनी व इटली येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी बेनिटो मुसोलिनी [१५] व १६ जून १९४१ रोजी, बर्लिन येथे एडॉल्फ हिटलर [१६] यांची भेट घेतली.
त्यांच्या सर्व करकीर्दी मध्ये जपानी आर्मीच्या सुधारणांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे युद्ध मंत्री हिडेकी टोजो [१७] यांच्याशी त्यांचे अनेक खटके उडाले.
दुसरे महायुद्ध
[संपादन]मलेशिया व सिंगापूर
[संपादन]जपानच्या 'ट्वेन्टी फिफ्थ आर्मी' [१८] चे नेतृत्व, ६ नोव्हेंबर १९४१ रोजी ले. जन. यामशिता यांच्याकडे सोपविण्यात आले. मलेशियात यश मिळवायचे असेल तर वायुसेना व जलसेना या दोन्हींच्या मदतीने तिथे सैन्य उतरावे लागेल, हे त्यांनी जाणले. त्याप्रमाणे ८ डिसेंबर रोजी, फ्रेंच इंडो-चायना [१९] मधून त्यांनी मलेशियातील चढाईला [२०] सुरुवात केली. ब्रिटिश मलेशियातील सैनिकांचे संख्याबळ जपानी सैनिकांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त होते. जपानी सैनिकांची संख्या ब्रिटिश सैन्याच्या केवळ एक तृतीयांश होती. त्यामुळे कुठल्याही दीर्घकालीन लढाईत न अडकता, वेगवान हालचाली करून मोक्याची ठिकाणे काबिज करणे, अशी युद्धनीती त्यांनी अवलंबिली.
१५ फेब्रुवारी १९४२ ला सिंगापूरच्या शरणागतीने [२१] या चढाईची सांगता झाली. यामशिता च्या ३०,००० सैनिकांपुढे, मित्र पक्षाच्या ८०,००० सैनिकांनी शरणागती स्वीकारली. यात ब्रिटिश, भारतीय व ऑस्ट्रेलियन सैनिकांचा समावेश होता. ब्रिटिश इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव होता. या विजयामुळे, यामशिता- 'मलेशियाचा वाघ' म्हणून ओळखले जाऊ लागले.
मलेशिया व सिंगापूर वरील जपानी राजवटीत अनेक युद्धकालीन गुन्हे नोंदविण्यात आले. युद्धकैद्यांना दिलेली वागणूक, अलेक्झांड्रा हॉस्पिटल [२२] मधील हत्याकांड, सूक चिंग [२३] हत्याकांड इत्यादींचा समावेश यात होतो. या युद्धकालीन गुन्ह्यांमध्ये यामशिता यांच्या सहभागाबद्दल वेगवेगळी मते आहेत, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या सैन्याने केलेले प्रमाद, ते रोखू शकले नाहीत असे मानले जाते.
मंचुकूओ (Manchukuo)
[संपादन]१७ जुलै १९४२ रोजी यामशिका यांची नेमणूक मंचुकूओ [२४] येथे करण्यात आली. जपानच्या 'फर्स्ट एरिया आर्मी' [२५] चे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले. अशा पद्धतीने प्रशांत महासागरात चाललेल्या युद्धातून त्यांना एकप्रकारे दूर ठेवण्यात आले. १९४३ मध्ये त्यांना जनरल हा हुद्दा मिळाला. काहींच्या मते, जर सोविएत रशिया ने जर्मनी पुढे शरणागती पत्करली असती, तर सोविएत रशियावर चढाई करण्याच्या तयारी साठी त्यांची नेमणूक या भागात करण्यात आली होती.
फिलिपाईन्स
[संपादन]सप्टेंबर १९४४ ला, युद्धा मधील जपानची स्थिति नाजूक झाली होती. अशावेळी, यामशिता यांची नेमणूक फिलिपाईन्स मधील जपानी साम्राज्य टिकविण्यासाठी केली गेली. 'फोर्टींथ एरिया आर्मी' [२६] ची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
येथील युद्धात, अमेरिकन व फिलिपिनो तील बंडखोर सैनिकांपुढे [२७], जपानी सैन्याचा टिकाव लागला नाही, तरीसुद्धा उत्तर फिलिपाईन्स मधील कियानगन (Kiangan) [२८] शहरावर जपानी सैन्याचा ताबा, जपानने युद्धात शरणागती पत्करल्या नंतर सुद्धा, २ सप्टेंबर १९४५ पर्यंत राहिला. शेवटी जनरल जोनाथन वेनराईट व आर्थर परसिव्हेल यांच्या उपस्थितीत, यामशिता यांनी शरणागती पत्करली. या पूर्वी, सिंगापूर येथे, ब्रिटिश सैन्याने, आर्थर परसिव्हेल यांच्या नेतृत्वाखाली, यामशिता यांच्या समोर शरणागती पत्करली होती.
खटला
[संपादन]२९ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर १९४५ या कालावधीत, मनिला येथे, अमेरिकन वॉर ट्रायबुनल समोर यामशिता यांच्या विरुद्ध खटला चालवला गेला. मनिला येथील नागरिकांचे हत्याकांड, फिलिपिन्स मधील इतर हत्या, युद्धबंद्यांना दिलेली वागणूक इत्यादी आरोपांमध्ये ते दोषी ठरले, व त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रामुख्याने हाताखालील सैन्याने केलेल्या अत्याचारास रोखता न आल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
या खटल्यानंतर, आंतरराष्ट्रीय कायद्यात, हाताखालच्या सैन्याने केलेल्या युद्धकालीन अत्याचारास, अधिकाऱ्याला जबाबदार ठरविण्यात येणे; याला यामशिता स्टँडर्ड असे म्हणले जाते.
२३ फेब्रुवारी १९४६ रोजी यामशिता यांना मनिला येथे फाशीची शिक्षा देण्यात आली.
- ^ Marouf Hasian, In the Name of Necessity: Military Tribunals and the Loss of American Civil Liberties, University of Alabama Press, 2012, p. 286 (chapter 7, note 6). "Contemporary writers sometimes called Yamashita the "Beast of Bataan." See "The Philippines: Quiet Room in Manila," Time, 12 November, 194.5, 21."