टॉम क्रूझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टॉम क्रूझ
जन्म थॉमस क्रूझ मॅपोथर चौथा
३ जुलै, १९६२ (1962-07-03) (वय: ६१)
सिरॅक्युज, न्यू यॉर्क, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र
  • अभिनय
  • ‌‌‌चित्रपट निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८१ - चालू
भाषा इंग्रजी
पत्नी मिमी रॉजर्स (१९८७-९०)
निकोल किडमन (१९९०-२००१)
केटी होम्स (२००६-१२)
अधिकृत संकेतस्थळ tomcruise.com
धर्म विज्ञानशास्त्र

थॉमस क्रूझ मॅपोथर चौथा तथा टॉम क्रूझ (३ जुलै, १९६२ - ) हा एक अमेरिकन अभिनेता आणि निर्माता आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक[१] असलेल्या टॉमला चार अकादमी पुरस्कार नामांकने, मानद पाल्मे डी'ओर आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या चित्रपटांनी उत्तर अमेरिकेत $४ अब्ज आणि जगभरात $११.५ अब्जांपेक्षा जास्त कमाई केली आहे, [२] ज्यामुळे तो आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपट तारकांपैकी एक बनला आहे. [३]

टॉमने १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस अभिनय करण्यास सुरुवात केली आणि विनोदी चित्रपट रिस्की बिझनेस (१९८३) आणि अॅक्शन चित्रपट टॉप गन (१९८६) मधील प्रमुख भूमिकांतून यश मिळवले. द कलर ऑफ मनी (१९८६), रेन मॅन (१९८८), आणि बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै (१९८९) या नाट्यमय चित्रपटांमधील भूमिकांमुळे त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. यापैकी बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलैमधील रॉन कोविकच्या भूमिकेसाठी त्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त केले. १९९० च्या दशकात एक आघाडीचा हॉलीवूड स्टार म्हणून, त्याने अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, यांत अ फ्यू गुड मेन (१९९२), थरारपट द फर्म (१९९३), भयपट इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर (१९९४), आणि प्रणयपट जेरी मॅग्वायर (१९९६) यांचा समावेश आहे. यांपैकी जेरी मॅग्वायर चित्रपटासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि त्याचे दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन प्राप्त केले. मॅग्नोलिया (१९९९) चित्रपटातील प्रेरक वक्ता म्हणून क्रूझच्या भूमिकेसाठी त्याला आणखी एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

यानंतर क्रूझने मोठ्या प्रमाणावर सायन्स फिक्शन आणि अॅक्शन फिल्म्समध्ये काम करून स्वतःला अॅक्शन स्टार म्हणून स्थापित केले आहे. क्रूझ अनेकदा धोकादायक स्टंट स्वतःच करतो. तो १९९६ पासून मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मालिकेत इथन हंटची भूमिका करत आहे. या शैलीतील त्याच्या इतर उल्लेखनीय भूमिकांमध्ये व्हॅनिला स्काय (२००१), मायनॉरिटी रिपोर्ट (२००२), द लास्ट सामुराई (२००३), कोलॅटरल (२००४), वॉर ऑफ द वर्ल्ड्स (२००५), नाइट अँड डे (२०१०), जॅक रीचर (२०१२), ओब्लिव्हियन (२०१३), एज ऑफ टूमारो (२०१४), आणि टॉप गन: मॅव्हरिक यांचा समावेश होतो. यांपैकी मॅव्हरिक हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

क्रूझने अभिनेत्री मिमी रॉजर्स, निकोल किडमन आणि केटी होम्स यांच्याशी लग्न केले होते. त्याला तीन मुले आहेत, त्यापैकी दोन किडमनसोबत असताना दत्तक घेण्यात आली होती आणि दुसरी होम्ससोबत त्याची मुलगी आहे. क्रूझ हा चर्च ऑफ सायंटोलॉजीचा पुरस्कर्ता आहे, आपल्या डिस्लेक्सियावर मात करण्यात या चर्चने त्याला मदत केली. २००० च्या दशकात, त्याने मानसोपचार आणि नैराश्यविरोधी औषधांवर केलेल्या टीका, युरोपमध्ये सायंटॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेले त्याचे प्रयत्न आणि सायंटोलॉजीला प्रोत्साहन देणारी त्याची उघड झालेली मुलाखत हा वादात अडकला होता.[४]

बालपण[संपादन]

क्रूझ यांच्या आईचे नाव मेरी ली आहे व वडिलांचे नाव थॉमस क्रुझ मॅपोथर ३ आहे. त्यांच्या आई या विशेष गरज असलेल्या मुलांच्या शिक्षिका होत्या आणि वडील हे विद्युत अभियंता होते. टॉम क्रूझला तीन बहिणी आहेत‌. क्रूझ न्यू जर्सीतील ग्लेन रिज हायस्कूल मध्ये शिकला

अभिनय कारकीर्द[संपादन]

क्रूझ वयाच्या १८ व्या वर्षी आपल्या आई व सावत्र वडिलांच्या परवानगीने न्यू यॉर्क येथे अभिनय शिकण्यासाठी गेला. पोटापाण्यासाठी क्रूझने न्यू यॉर्कमध्ये होटेलमधील भांडी घासण्याचे काम केले. नंतर तो लॉस एंजेलसला गेला. तेथे त्याने दूरचित्रवाणीमालिकांमध्ये भूमिका मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाठी तो सीएए क्रिएटिव्ह आर्टिस्ट एजन्सीचा सदस्य झाला व त्याद्वारे त्याने अभिनय करण्यास प्राऱंभ केला. सर्व प्रथम क्रूझला १९८१ मध्ये एंडलेस लव्ह या चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर रिस्की बिझनेस या चित्रपटाने त्याला ओळख मिळवून दिली तर टाॅप गन या चित्रपटाने त्याला नावलौकिक मिळवून दिला.

जीवन[संपादन]

निवडक चित्रपट[संपादन]

नाव भूमिका वर्ष नोंदी
एंडलेस लव्ह
टाॅप गन
रिस्की बिझनेस
एज ऑफ टुमॉरो २०१४
मिशन इम्पाॅसिबल ईथन हंट
मिशन इम्पाॅसिबल २ ईथन हंट
मिशन इम्पाॅसिबल ३ ईथन हंट
मिशन इम्पाॅसिबल - घोस्ट प्रोटोकॉल ईथन हंट
मिशन इम्पाॅसिबल - रोग नेशन ईथन हंट
मिशन इम्पाॅसिबल - फॉल आऊट ईथन हंट २०१८
ऑब्लिव्हयन
नाइट अँड डे
मायनॉरिटी रिपोर्ट
द ममी

संदर्भ[संपादन]

  1. ^ Block, Alex Ben; Wilson, Lucy Autrey, eds. (2010). George Lucas's Blockbusting: A Decade-By-Decade Survey of Timeless Movies Including Untold Secrets of Their Financial and Cultural Success. HarperCollins. pp. 616–617, 714–715, 824–825 & 832. ISBN 978-0-06-177889-6.
  2. ^ "Tom Cruise Movie Box Office Results". Box Office Mojo. Archived from the original on September 10, 2019. August 16, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "People Index". Box Office Mojo. Archived from the original on June 27, 2019. August 16, 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Tom Cruise and Scientology". Los Angeles Times (इंग्रजी भाषेत). 2005-12-18. 2023-03-17 रोजी पाहिले.